Weather Alert: महाराष्ट्रात 24 तासांत वारं फिरलं, थंडी नव्हे, आता पावसाचा अलर्ट, कुठं बरसणार?
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather Alert: जानेवारी अखेर महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. 28 जानेवारी रोजी राज्यातील काही भागात पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
1/5

राज्यातील हवामानात सध्या लक्षणीय बदल पाहायला मिळत असून, थंडीचा प्रभाव हळूहळू कमी होत चालला आहे. ढगाळ वातावरण, वाढलेली आर्द्रता आणि काही भागांत झालेल्या अवकाळी पावसामुळे हवामानाचा अंदाज बदललेला दिसत आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आज अनेक जिल्ह्यांत सकाळी धुके, तर दुपारनंतर ढगाळ वातावरण अनुभवायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर आज राज्यातील वेगवेगळ्या भागांत हवामान कसं राहणार आहे, ते पाहूया.
advertisement
2/5
मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि कोकण किनारपट्टी भागात हवामान मुख्यत्वे ढगाळ ते अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात सकाळच्या वेळेत हलके धुके दिसू शकते. 27 जानेवारी रोजी बदलापूर आणि नवी मुंबईच्या काही भागांत पाऊस पडला होता. त्यामुळे आजही या भागात ढगाळ वातावरण राहणार आहे. या भागांत कमाल तापमान 26 ते 28 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 22 ते 24 अंश सेल्सिअस राहणार आहे.
advertisement
3/5
पश्चिम महाराष्ट्रात आज हवामान तुलनेने स्थिर राहण्याची शक्यता आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांत सकाळच्या वेळेत काही भागांत धुक्याचा हलका परिणाम दिसू शकतो. मात्र, सूर्य वर आल्यानंतर वातावरण हळूहळू स्वच्छ होईल आणि दिवसभर ऊन पडेल. पावसाची शक्यता अत्यंत कमी असून हवामान मुख्यतः कोरडे राहील. कमाल तापमान 26 ते 29 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 15 ते 20 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.
advertisement
4/5
मराठवाडा आणि विदर्भात हवामानात काही प्रमाणात अस्थिरता आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, नांदेड या मराठवाड्यातील जिल्ह्यांत दिवसभर या भागात ढगाळ वातावरण असेल. तर विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर परिसरात सकाळी हवामान निवळलेलं असू शकतं, मात्र दुपारनंतर ढग वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तुरळक ठिकाणी हलका पाऊस किंवा हवामानात अचानक बदल जाणवू शकतो. या दोन्ही विभागांत कमाल तापमान 28 ते 32 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 15 ते 20 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.
advertisement
5/5
एकूणच आज महाराष्ट्रात हिवाळ्याचा प्रभाव कमी झालेला दिसून येईल. राज्यातील बहुतांश भागांत सकाळी हलका गारवा जाणवेल, मात्र दिवसा ऊन आणि वाढलेली आर्द्रता यामुळे उष्णतेचा त्रास जाणवण्याची शक्यता आहे. काही भागांत ढगांची ये-जा सुरू राहील, तर उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता कायम आहे. पुढील काही दिवस तापमानात मोठी घसरण होण्याची वशक्यता नाही. उलट, किमान तापमान हळूहळू वाढत राहील आणि थंडी आणखी कमी होईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Weather Alert: महाराष्ट्रात 24 तासांत वारं फिरलं, थंडी नव्हे, आता पावसाचा अलर्ट, कुठं बरसणार?