TRENDING:

bhiwandi Fire: धुराचे लोळ अन् आगडोंब, क्षणात सगळं बेचिराख, भिवंडीतील भीषण आगीचे फोटो

Last Updated:
भिवंडीतील राहणाल ग्रामपंचायतीतील फर्निचर गोडाऊनला भीषण आग लागली आहे. सात ते आठ गोदामे जळाली असून अग्निशामक दलाचे प्रयत्न सुरू आहेत. परिसरात भीतीचे वातावरण आहे.
advertisement
1/6
धुराचे लोळ अन् आगडोंब, क्षणात सगळं बेचिराख, भिवंडीतील भीषण आगीचे फोटो
नरेश पाटील, प्रतिनिधी भिवंडी: भिवंडी तालुक्यातील राहणाल ग्रामपंचायत हद्दीतील स्वागत कंपाउंड मध्ये असणाऱ्या फर्निचर गोडाऊनला अचानक भीषण आग लागली आहे.
advertisement
2/6
आगीच्या स्वरूप एवढं भयंकर आहे की आगीच्या ठिकाणी सात ते आठ गोदाहून भक्षस्थानी पडले आहेत .आजूबाजूच्या इमारतीतील परिसरातील नागरिकांनाही हलवण्यात येत असून गोदामाचा काही भाग कोसळला सुरुवात झाली आहे.
advertisement
3/6
घटनास्थळी अग्निशामक दलाच्या ठाणे कल्याण भिवंडी महानगरपालिकेच्या 4 गाड्या दाखल असून, अगं नियंत्रण मिळवण्याचे अग्निशमन दलाचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत
advertisement
4/6
आगीच्या भडक्याने धुराचे लोळ 8 ते 10 किलोमिटर दूरवरुन सुद्धा दिसत आहेत. इतकी भीषण ही आग लागली आहे. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.
advertisement
5/6
मिळालेल्या माहितीनुसार प्लायवुड फोम रेग्झिंगचा मोठा साठा इथे होता. त्यामुळे ही आग जास्त भडकली, संपूर्ण इमारत आगीच्या भक्षस्थानी आली असून आजूबाजूच्या दुकानांनाही आग पसरली.
advertisement
6/6
आग विझवताना एक अग्निशामक दलाचा जवान जखमी झाला असून त्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू केले आहे.द रम्यान ही आग विझवण्यासाठी पाण्याची कमतरता भासत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
bhiwandi Fire: धुराचे लोळ अन् आगडोंब, क्षणात सगळं बेचिराख, भिवंडीतील भीषण आगीचे फोटो
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल