Pune Rain: पुणे, कोल्हापुरात पावसाची उघडीप, सोलापुरात वेगळीच स्थिती, आजचा हवामान अंदाज
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
Pune Rain: पश्चिम महाराष्ट्रात पावसाने उघडीप दिली आहे. पुणे ते कोल्हापूर हवामान स्थितीबाबत जाणून घेऊ.
advertisement
1/7

मान्सूनचे प्रवाह कमजोर झाल्याने राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. पुढील 24 तासात कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत जोरदार सरींची शक्यता असल्याने, तसेच विदर्भात विजांसह वादळी पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मात्र पश्चिम महाराष्ट्रासह उर्वरित राज्यात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
advertisement
2/7
मागील काही दिवसांपासून अंशतः घटलेले पुण्याचे कमाल तापमान पुन्हा 34 अंश सेल्सिअस इतके वाढणार आहे. पुढील 24 तासात पुण्यातील आकाश निरभ्र राहण्याचे संकेत आहेत. पुणे आणि पुण्याचा घाट परिसरात देखील पावसाची उघडीप राहिल. यावेळी कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस राहिल.
advertisement
3/7
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने उघडीत दिली असून 31.9 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. पुढील 24 तासात तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तसेच कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर हलक्या पावसाची शक्यता आहे.
advertisement
4/7
मे महिन्याच्या पावसाने झोडपलेला सातारा शेतीच्या कामांना गती देत आहे. जिल्ह्यात पावसाने उघडीत घेतली असून कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस राहिल. पुढील 24 तासात अंशतः आकाशासह तुरळक ठिकाणी रिमझिम पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून सांगण्यात आला आहे.
advertisement
5/7
सांगली जिल्ह्यात अवकाळी पावसापूर्वी झालेल्या हळद लागणीस अवकाळी पोषक ठरला आहे. पावसाने उघडीप दिल्याने शेतीच्या कामांनी गती घेतली आहे. मागील 24 तास 33 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तसेच पुढील 24 तासात तूरळक ठिकाणी हलक्या पावसासह आकाश ढगाळ असेल.
advertisement
6/7
सोलापूर जिल्ह्यातील तापमानात वाढ होत असून मागील 24 तासात पारा 35 अंशावर पोहोचला. तसेच पुढील 24 तासात पारा 35 अंशावर स्थिर राहण्याचा अंदाज आहे. सोलापूर जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी ढगाळ आकाशासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
advertisement
7/7
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र जमिनीवर आल्यानंतर आसाममध्ये कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. उत्तर प्रदेशापासून पूर्व विदर्भापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. मान्सून कमजोर होताच राज्यात पाऊस थांबला असून, तुरळक ठिकाणी हलका पाऊस हजेरी लावत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Pune Rain: पुणे, कोल्हापुरात पावसाची उघडीप, सोलापुरात वेगळीच स्थिती, आजचा हवामान अंदाज