TRENDING:

Astrology : बऱ्याच दिवसांनी आला राजयोग, 5 राशींचं पालटणार नशीब, अचानक येईल पैसा!

Last Updated:
सध्या शुक्र मीन राशीत आहे. शुक्र मीन राशीत असल्याने मालव्य राजयोग निर्माण होत आहे. पुढचे नऊ दिवस मालव्य राजयोग सुरू राहील.
advertisement
1/7
Astrology : बऱ्याच दिवसांनी आला राजयोग, 5 राशींचं पालटणार नशीब, अचानक येईल पैसा!
ज्या व्यक्ती राशिभविष्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यापैकी काही जणांसाठी एक चांगली बातमी आहे. सध्या शुक्र मीन राशीत आहे. शुक्र मीन राशीत असल्याने मालव्य राजयोग निर्माण होत आहे. पुढचे नऊ दिवस मालव्य राजयोग सुरू राहील.
advertisement
2/7
24 एप्रिल रोजी जेव्हा शुक्र मीन राशीतून बाहेर पडून मेष राशीत प्रवेश करील तोपर्यंत राजयोग असेल. मेष राशीत शुक्राच्या संक्रमणापूर्वीचे हे नऊ दिवस पाच राशींसाठी खूप शुभ आहेत. या राशींच्या व्यक्तींसाठी हा काळ खूप फायदेशीर ठरू शकतो.  
advertisement
3/7
वृषभ रास : मालव्य राजयोग वृषभ राशीच्या व्यक्तींना खूप लाभ देऊ शकतो. तुमचा उत्साह आणि आत्मविश्वास टिकून राहील. तुम्हाला धनलाभ होईल. मान-सन्मान वाढेल. एखादं मोठं यश मिळू शकतं. या काळात कोणाचाही अपमान करू नका.
advertisement
4/7
सिंह रास : या राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ खूप आनंद घेऊन येईल. कौटुंबिक सदस्याशी संबंधित एखादी चांगली बातमी मिळू शकते. जमीन आणि मालमत्तेशी संबंधित व्यवहार होऊ शकतात. परदेशात नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्यांना विशेष लाभ मिळू शकतो.
advertisement
5/7
तूळ रास : तूळ राशीच्या व्यक्तींना प्रलंबित कामं पूर्ण झाल्याने मोठा आनंद मिळेल. हा काळ तुमच्यासाठी भाग्यदायी आहे. करिअर आणि पैशांशी संबंधित मोठी गोष्ट घडू शकते. तुम्हाला नवीन नोकरी मिळू शकते किंवा इच्छित ठिकाणी बदली होऊ शकते. धार्मिक स्थळाला भेट देण्याची संधी मिळू शकते.
advertisement
6/7
धनू रास : धनू राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ अतिशय शुभ असेल. प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळेल आणि कामं पूर्ण होतील. नोकरीचा शोध पूर्ण होईल. तुम्हाला तुमच्या आवडीचं काम मिळू शकतं. लव्ह लाइफबाबत सावध राहा.
advertisement
7/7
मीन रास : मीन राशीच्या व्यक्तींना आयुष्यात या काळात खूप आनंद मिळेल. कौटुंबिक सदस्याच्या यशामुळे तुमचं मन प्रसन्न असेल. परदेशात नोकरी करण्याची इच्छा पूर्ण होईल. करिअरमध्ये प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतील. प्रेमी युगलांचं लग्न ठरू शकतं.(Disclaimer: इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. ज्योतिषाचार्यांनी आपली मतं व्यक्त केली आहे. त्या न्यूज18 मराठी सहमत नाही. न्यूज 18 मराठी अशा कोणत्याही धार्मिकतेवर आधारीत माहितीची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Astrology : बऱ्याच दिवसांनी आला राजयोग, 5 राशींचं पालटणार नशीब, अचानक येईल पैसा!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल