TRENDING:

Weekly Horoscope: 7 राशींसाठी हा आठवडा सर्वोत्तम, मग चिंता करण्याची गरज कोणाला?

Last Updated:
कर्म चांगले तर यश मिळतंच, यात काहीच दुमत नाही. परंतु एखादा दिवस आपल्यासाठी कसा असेल हे आपल्या कुंडलीतील ग्रह-ताऱ्यांच्या स्थितीवर ठरत असतं आणि सर्व ग्रह-तारे वेळोवेळी आपली चाल बदलतात. त्यामुळे आता 6 मे 2024 रोजी सुरू झालेला आठवडा कोणासाठी कसा असणार पाहूया. झारखंडचे ज्योतिषी पंडित नंदकिशोर मुद्गल यांनी याबाबत माहिती दिली आहे. (परमजीत कुमार, प्रतिनिधी / देवघर)
advertisement
1/13
Weekly Horoscope: 7 राशींसाठी हा आठवडा सर्वोत्तम, मग चिंता करण्याची गरज कोणाला?
मेष : आपल्यासाठी हा आठवडा अत्यंत उत्तम आहे. विद्यार्थांचं अभ्यासात मन लागेल. कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल. नोकरीच्या शोधात असाल तर आता चांगली संधी मिळेल. कामानिमित्त प्रवास होईल, त्यातून आपला फायदाच होईल. कामात बढती मिळण्याची शक्यता आहे. करियरबाबत शुभवार्ता कळतील.
advertisement
2/13
वृषभ : आपण या आठवड्यात खर्च जरा जपून करावा. कारण उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशी परिस्थिती असू शकते, त्यामुळे ताण येईल. मन शांत ठेवून व्यवहार करा. आरोग्याची काळजी घ्या. कामात आळस अजिबात येऊ देऊ नका. नोकरीत वरिष्ठ आपल्यावर रागवू शकतात.
advertisement
3/13
मिथुन : आपल्यासाठी हा आठवडा अत्यंत सकारात्मक असेल. सगळी अडलेली कामं आता पूर्ण होतील. करियरमध्ये प्रगती होईल. प्रवास होऊ शकतो. नातेसंबंध सुधारतील. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. धनलाभ होईल. गुंतवणुकीसाठी अनुकूल परिस्थिती आहे. संपत्तीबाबतचे वाद आता मिटतील.
advertisement
4/13
कर्क : आपल्यासाठीसुद्धा हा आठवडा सकारात्मक आहे. आपला मान-सन्मान वाढेल. वैवाहिक जीवनात आनंद येईल. नवं काम सुरू करण्यासाठी अनुकूल काळ आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी मिळू शकते. आरोग्यही चांगली साथ देईल.
advertisement
5/13
सिंह : आपल्यासाठी हा आठवडा जरा अडचणींचा आहे. मन अस्वस्थ राहिल. वैवाहिक जीवनात अडथळे येतील. शत्रूंपासून सावध राहा. कोणावरही डोळे बंद करून विश्वास ठेवू नका. कुटुंबातील एखाद्या सदस्याची तब्येत बिघडू शकते. त्यामुळे रुग्णालयात जावं लागेल. विद्यार्थ्यांचं अभ्यासात मन लागणार नाही.
advertisement
6/13
कन्या : आपल्यासाठी हा आठवडा सकारात्मक आहे. विद्यार्थ्यांचा अभ्यास उत्तम होईल. शिक्षणासाठी परदेशी जाण्याचा योग आहे. नोकरीत बदल होऊ शकतात. कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या. व्यापारात प्रचंड आर्थिक फायदा होईल.
advertisement
7/13
तूळ : आपल्यासाठी हा आठवडा उत्तम आहे. हाती घ्याल त्या कार्यात यश मिळेल. आत्मविश्वास वाढेल. करियरमध्ये यश मिळेल. नोकरी करणाऱ्यांना कामासंबंधित शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठ आपलं कौतुक करतील. वडिलोपार्जित संपत्तीबाबतचे वाद मिटतील. कोर्ट-कचेरीच्या प्रकरणात निकाल आपल्या बाजूने लागेल.
advertisement
8/13
वृश्चिक : कोणत्याही कामात शॉर्टकट मार्ग स्विकारू नये. डोकं शांत ठेवून एकाग्रतेने कामं करावी. स्वत:चे निर्णय स्वत: घ्यावे नाहीतर आर्थिक नुकसान होऊ शकतं. विनाकारण कोणत्याच वादात पडू नका, नाहीतर कोर्ट-कचेरीच्या फेऱ्या पाठीशी लागतील. कोणतंही काम आत्मविश्वासाने करा. प्रेमप्रकरणात अडचणी येतील.
advertisement
9/13
धनू : आपल्या सर्व कामांमध्ये आळस आड येईल, त्यामुळे कामांचा वेग मंदावेल. यश मिळवण्यासाठी वाट पाहावी लागेल. कामाचा व्याप डोक्यावर पडल्याने मन अस्वस्थ राहिल. शत्रूंपासून जरा सावध राहा. वादात पडू शकता. त्यामुळे लहान लहान गोष्टींना जास्त महत्त्व देऊ नका.
advertisement
10/13
मकर : आपल्यासाठी हा आठवडा अनुकूल आहे. करियर, व्यवसायाबाबत शुभवार्ता मिळतील. शेअर बाजारात केलेल्या गुंतवणुकीतून फायदा होईल. आपल्यामुळे आपल्या कुटुंबियांचा मान-सन्मान वाढेल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल. घरात शुभकार्य पार पडू शकतं.
advertisement
11/13
कुंभ : आपल्यासाठी हा आठवडा नकारात्मक आहे. शनी ग्रहाचा या राशीत नक्षत्र परिवर्तन होणार असल्याने आपल्याला अडचणींचा सामना करावा लागेल. वाहन चालवताना जपून, नाहीतर अपघात होण्याची शक्यता आहे. कामानिमित्त धावपळ होईल. कुटुंबातील एखाद्या सदस्याची प्रकृती बिघडू शकते. त्यामुळे रुग्णालयात जावं लागेल. जोडीदारासोबत वाद होतील.
advertisement
12/13
मीन : आपल्यासाठी हा आठवडा सकारात्मक आहे. <a href="https://news18marathi.com/photogallery/religion/akshaya-tritiya-2024-do-not-miss-the-muhurat-of-buying-gold-jewelry-l18w-mhij-1175921.html">गुड न्यूज</a> मिळू शकते. <a href="https://news18marathi.com/photogallery/religion/this-year-there-is-no-shubh-muhurat-for-marriage-on-akshaya-tritiya-l18w-mhij-1175938.html">अध्यात्मिक</a> कार्यात सहभागी व्हाल. नोकरीत मनासारखी बढती मिळेल. व्यवसायात आर्थिक नफा होईल. व्यापार विस्तारेल.
advertisement
13/13
(सूचना : येथे दिलेली माहिती <a href="https://news18marathi.com/religion/">धार्मिक</a> श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Weekly Horoscope: 7 राशींसाठी हा आठवडा सर्वोत्तम, मग चिंता करण्याची गरज कोणाला?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल