TRENDING:

मंगळ-राहूचा सर्वात खतरनाक योग! 4 राशींच्या व्यक्तींनी 1 जूनपर्यंत कोणत्याच वादात पडू नये

Last Updated:
एकाच राशीत 2 ग्रह आले की, त्यांची युती झाली असं म्हणतात. या युतीतून वेगवेगळे योग निर्माण होतात. ज्यांचा काही राशींना फायदा होतो, तर काही राशींना तोटा होतो. मंगळ आणि राहू ग्रहाची युती सर्वात खतरनाक मानली जाते, कारण या युतीलाच 'अंगारक योग' म्हणतात. सध्या राहू मीन राशीत विराजमान आहे, तिथे मंगळ ग्रहाचाही प्रवेश झालाय. राहू म्हणजे आधीच अडचणी. त्यात येत्या 1 जूनपर्यंत मीन राशीत ही युती अशीच राहिल. त्यामुळे काही राशींसाठी हा काळ प्रचंड अडचणींचा आहे, हे निश्चित. (परमजीत कुमार, प्रतिनिधी / देवघर)
advertisement
1/5
मंगळ-राहूचा सर्वात खतरनाक योग! 4 राशींच्या व्यक्तींनी 1 जूनपर्यंत वादात पडू नये
मेष : अंगारक योगामुळे आपल्या आर्थिक अडचणीत वाढ होईल. खर्च वाढल्याने कर्ज घ्यावं लागेल, त्यामुळे मानसिक ताण येईल. एखाद्या प्रकरणात कोर्ट-कचेरीच्या फेऱ्या पाठी लागतील. या काळात शक्यतो प्रवास करणं टाळा.
advertisement
2/5
कर्क : आपल्यावर या योगाचा नकारात्मक प्रभाव पडेल. रागावर नियंत्रण ठेवा. कोणत्याही वादात पडू नका. कुटुंबात वाद होईल. तुमची वडिलांसोबत बाचाबाची होऊ शकते. प्रेमसंबंधांमध्येही अडचणी येतील. 1 जूनपर्यंत जरा काळजी घ्या.
advertisement
3/5
कन्या : आपल्यावरही या योगाचा नकारात्मक परिणाम होणार आहे. आपला अपघात घडण्याची शक्यता आहे, त्यामुळे वाहन जपून चालवा. खर्च वाढल्याने बजेट कोलमडेल. कोणत्याही गोष्टीवरून जोडीदारासोबत वाद होऊ शकतो. विद्यार्थ्यांचं अभ्यासात लक्ष लागणार नाही.
advertisement
4/5
वृश्चिक : अंगारक योगामुळे आपल्याला <a href="https://news18marathi.com/photogallery/religion/vastu-tips-avoid-keys-to-place-anywhere-at-home-fix-place-according-to-right-direction-gh-mhkk-1174061.html">अडचणींचा सामना</a> करावा लागेल. जरा शब्दांवर, <a href="https://news18marathi.com/photogallery/astrology/numerology-marathi-hekekhor-or-conciliatory-date-of-birth-will-tell-how-the-other-persons-character-mhrp-1174133.html">कृती</a>वर नियंत्रण ठेवा नाहीतर नाती दुरावतील. वेगवेगळ्या कामात अडथळे येतील. त्यामुळे आपण अस्वस्थ राहाल.
advertisement
5/5
(सूचना : येथे दिलेली माहिती <a href="https://news18marathi.com/religion/">धार्मिक</a> श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
मंगळ-राहूचा सर्वात खतरनाक योग! 4 राशींच्या व्यक्तींनी 1 जूनपर्यंत कोणत्याच वादात पडू नये
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल