Vat Purnima Vrat 2024: वडाच्या पूजेसाठी अभिजित मुहूर्त चुकवू नका; पहा वट पौर्णिमेची सर्व माहिती
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Vat Purnima Vrat 2024: वट सावित्री पौर्णिमा व्रत दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला पाळले जाते. विवाहित स्त्रिया वट सावित्री पौर्णिमेचे व्रत ठेवतात, त्यामुळे त्यांचे वैवाहिक जीवन अबाधित राहते, पतीला दीर्घायुष्य लाभते आणि वैवाहिक जीवन सुखी राहते, असे मानले जाते. वट सावित्री व्रत अखंड सौभाग्य प्रदान करणारे मानले जाते. यावर्षी वट सावित्री पौर्णिमा 21 जूनला आहे की 22 जूनला? त्याच्या नेमक्या तारखेबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे.
advertisement
1/5

कारण वट सावित्री पौर्णिमा व्रतासाठी आवश्यक असलेली ज्येष्ठ पौर्णिमेची तिथी 21 जून रोजी सकाळी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 22 जूनच्या सकाळपर्यंत असेल. तिरुपतीचे ज्योतिषी डॉ. कृष्ण कुमार भार्गव यांच्याकडून जाणून घेऊ, वट सावित्री पौर्णिमा व्रत कधी आहे? योग्य तिथी कोणती? वट सावित्री पौर्णिमा व्रताचे पूजन करण्यासाठी शुभ मुहूर्त कोणता आहे.
advertisement
2/5
वैदिक दिनदर्शिकेनुसार, वट सावित्री पौर्णिमा व्रतासाठी ज्येष्ठ पौर्णिमा तिथी या वर्षी शुक्रवार, 21 जून रोजी सकाळी 07:31 पासून सुरू होत आहे आणि शनिवार, 22 जून रोजी सकाळी 06:37 पर्यंत आहे. तिथी नेहमी सूर्योदयाच्या वेळेपासून मोजली जाते. या आधारावर, ज्येष्ठ पौर्णिमा तिथी 22 जून रोजी आहे कारण त्या दिवशी सूर्योदय पहाटे 05:24 वाजता होईल, तर 21 जून रोजी सूर्योदय पहाटे 05:24 वाजता होईल, परंतु पौर्णिमा तिथी सूर्योदयानंतर होत आहे.
advertisement
3/5
वट सावित्री पौर्णिमा व्रताची नेमकी तारीख कोणती? -पौर्णिमेच्या व्रतासाठी, पौर्णिमेच्या तिथीला चंद्रोदय होणे आवश्यक आहे. अशा स्थितीत, कॅलेंडरनुसार, ज्येष्ठ पौर्णिमेचा चंद्रोदय 21 जून रोजी होत आहे. त्यामुळे शुक्रवार, 21 जून रोजी वट सावित्री पौर्णिमा व्रत करणेच योग्य राहील. म्हणजे वडाची पूजा, सूत गुंडाळणे, व्रत या गोष्टी 21 तारखेलाच करावे.
advertisement
4/5
वट सावित्री पौर्णिमा व्रत 2024 मुहूर्त - वट सावित्री पौर्णिमा व्रताच्या दिवशी 21 जून रोजी शुभ योग आणि ज्येष्ठ नक्षत्र आहे. शुभ योग सकाळपासून संध्याकाळी 06.42 पर्यंत आहे, तर ज्येष्ठ नक्षत्र देखील सकाळपासून संध्याकाळी 06.19 पर्यंत आहे. त्या दिवसाचा शुभ मुहूर्त किंवा अभिजीत मुहूर्त सकाळी 11:55 ते दुपारी 12:51 पर्यंत आहे. वट सावित्री पौर्णिमा व्रताची पूजा याच शुभ योगात करावी, ते तुमच्यासाठी शुभ राहील.
advertisement
5/5
वट सावित्री पौर्णिमेच्या व्रताचे महत्त्व -वट पौर्णिमा किंवा वट सावित्री पौर्णिमेचे व्रत पतीचे दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी करण्याची परंपरा आहे. या व्रतामध्ये देवी सावित्री, सत्यवान आणि वटवृक्षाची पूजा केली जाते. वट सावित्रीचे व्रत महिला करत असल्या तरी पुरुषांनीही आपल्या पत्नीच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि सुखी जीवनासाठी या व्रतामध्ये सहभाग घ्यावा. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Vat Purnima Vrat 2024: वडाच्या पूजेसाठी अभिजित मुहूर्त चुकवू नका; पहा वट पौर्णिमेची सर्व माहिती