खूप मेहनत करता, पण Luck देत नाही साथ? ही पौर्णिमा चूकवू नका, करा जबरदस्त उपाय
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
गुलाबाचा रंग लाल असो, गुलाबी, पांढरा किंवा पिवळा असो, हे फूल कधीही आकर्षकच दिसतं. म्हणूनच गुलाबाला फुलांचा राजा म्हणतात आणि गुलाबाच्या मऊ पाकळ्यांमुळे त्याला प्रेमाचं प्रतीकही मानलं जातं. पूजेतसुद्धा गुलाबाला विशेष महत्त्व असतं, कारण हे फूल देवी-देवतांना प्रिय मानतात. विशेषतः लक्ष्मीपूजनात गुलाबाचा आवर्जून समावेश करतात. तसंच आर्थिक संकटांवरही गुलाबाचे विविध उपाय केले जातात. उज्जैनचे ज्योतिषी रवी शुक्ला यांनी याबाबत माहिती दिली आहे. (शुभम मरमट, प्रतिनिधी / उज्जैन)
advertisement
1/5

येत्या 21 तारखेला पौर्णिमा आहे. आर्थिक अडचणी असतील, तर हा दिवस न चूकवण्याचा सल्ला ज्योतिषांनी दिलाय. या दिवशी नेमके कोणते उपाय करावे हेही त्यांनी सांगितलंय. ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमा तिथीला 21 जून रोजी सकाळी 07 वाजून 31 मिनिटांनी सुरुवात होईल आणि दुसऱ्या दिवशी 22 जून रोजी सकाळी 06 वाजून 37 मिनिटांनी ही तिथी संपेल.
advertisement
2/5
जर कधीच मनासारखा खर्च करता येत नसेल, कायम पैशांची चणचण भासत असेल किंवा आपल्या वाट्याला कर्जबाजारीपणा आला असेल तर 5 लाल गुलाब घ्या. 1 कापड घेऊन, त्याच्या 4 कोनांना 4 गुलाब बांधा आणि मधोमध 1 गुलाब बांधा. हे गुलाबाचं कापड आता नदीत प्रवाहित करा. यामुळे हळूहळू आपल्या डोक्यावरचं कर्ज कमी होईल.
advertisement
3/5
घरात सतत वाद होत असतील, अजिबात सुख-समृद्धीचं वातावरण नसेल, तर पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी देवीला लाल गुलाबाची फुलं अर्पण करा. मग असं सतत 5 शुक्रवारी करावं. यामुळे लक्ष्मी देवी प्रसन्न होते आणि घरात सुख-समृद्धीचं आगमन व्हायलाही सुरुवात होते.
advertisement
4/5
कितीही कष्ट करून यश आपल्या वाट्याला येत नसेल, तर पौर्णिमेच्या दिवशी 3 गुलाब आणि 3 बेल फुलं पाण्यात प्रवाहित करा. यामुळे आपली सगळी अडलेली कामं मार्गी लागतील. ज्योतिषशास्त्रानुसार, जर तुमच्या कुंडलीत कोणता <a href="https://news18marathi.com/religion/it-is-most-important-to-pay-attention-to-these-two-doshas-before-marriage-mhij-1198863.html">ग्रह दोष</a> असेल तर त्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी एका पानात गुलाबाच्या 5 पाकळ्या घेऊन आई भगवतीला अर्पण करा. त्यामुळे ग्रह दोष हळूहळू दूर होतील आणि दोषांमुळे निर्माण झालेल्या अडचणी कमी होण्यासही मदत मिळेल.
advertisement
5/5
सूचना : येथे दिलेली माहिती <a href="https://news18marathi.com/religion/astrology-remedies-for-nazar-dosh-mhij-1198930.html">धार्मिक</a> <a href="https://news18marathi.com/religion/meanings-of-dreams-about-horses-mhij-1198429.html">श्रद्धेवर</a> आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
खूप मेहनत करता, पण Luck देत नाही साथ? ही पौर्णिमा चूकवू नका, करा जबरदस्त उपाय