Numerology: भाग्यांक म्हणजे नेमका कोणता अंक, कसा काढायचा तो? गणित सोपं!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
Bhagyank Calculation: अंकशास्त्र हा ज्योतिषशास्त्राचा महत्त्वाचा भाग आहे. अंकशास्त्र सांगतं की, 1 ते 9 अंकांचा संबंध नवग्रहांशी असतो आणि प्रत्येक ग्रहाला विशिष्ट महत्त्व असतं. त्यामुळे जन्मतारखेनुसार ग्रहांचे गुण व्यक्तीच्या स्वभावात उतरतात. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात 2 अंक अतिशय महत्त्वाचे असतात, एक असतो मूलांक आणि दुसरा भाग्यांक.
advertisement
1/5

अंकशास्त्रानुसार, आपल्या जन्मतारखेचा जो ग्रह असतो, त्याचे फायदे आपल्याला कळत, नकळतपणे मिळतात. उदाहरणार्थ, 1 अंकावर सूर्य ग्रहाची सत्ता असते. सूर्याला म्हणतात 'ग्रहांचा राजा'. त्यामुळे ज्यांची जन्मतारीख 1 असते त्या व्यक्ती अगदी राजासारखं जगणं पसंत करतात.
advertisement
2/5
जर आपली जन्मतारीख 1 ते 9 दरम्यान असेल तर तोच आपला मूलांक असतो. परंतु जर आपला जन्म 2 आकडी तारखेला झाला असेल तर त्या दोन्ही अंकांची बेरीज करून जे 1 आकडी उत्तर मिळतं, तो आपला मूलांक असतो. उदाहरणार्थ जर आपला जन्म कोणत्याही महिन्याच्या 29 तारखेला झाला असेल, तर आपला मूलांक असेल 2 कारण 2+9=11 मग 1+1=2 असं गणित होतं. आता भाग्यांक कसा काढायचा जाणून घेऊया.
advertisement
3/5
आपली जन्मतारीख, जन्म महिना आणि जन्म वर्ष अशा तीनही अंकांची बेरीज करून 1 अंकी उत्तर येतं तो आपला भाग्यांक असतो. उदाहरणार्थ जर आपली जन्मतारीख 7/02/1998 असेल तर आपला भाग्यांक येईल 9 (7+2+1+9+9+8=36, मग 3+6=9).
advertisement
4/5
मूलांक आणि भाग्यांक हे दोन्ही अंक प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात अत्यंत फायद्याचे ठरतात, असं अंकतज्ज्ञांनी सांगितलं. जन्मतारखेनंतर जर कोणता अंक आपल्यासाठी सर्वाधिक लकी असेल तर तो असतो आपला भाग्यांक.
advertisement
5/5
सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Numerology: भाग्यांक म्हणजे नेमका कोणता अंक, कसा काढायचा तो? गणित सोपं!