TRENDING:

Numerology: जन्मतारीख नाही 'हा' अंक चमकवतो नशीब, Calculation सोपं!

Last Updated:
'हा' माझा Lucky number आहे, असं आपण अनेकजणांकडून ऐकतो. तसंच आपल्यासाठीही काही नंबर लकी असतात असं आपल्याला वाटतं. साधारणत: ती आपली जन्मतारीखच असते. पण तुम्हाला माहितीये का, Numerology म्हणजेच अंकशास्त्रानुसार आपल्यासाठी काही नंबर खरोखर लकी असतात. ती आपली जन्मतारीख नसते, पण जन्मतारखेवरूनच हा लकी नंबर काढता येतो. ज्यामुळे आपल्या आयुष्यात प्रचंड भरभराट होते, म्हणूनच त्याला Angel number म्हणतात. (उधव कृष्ण, प्रतिनिधी / पाटणा)
advertisement
1/5
Numerology: जन्मतारीख नाही 'हा' अंक चमकवतो नशीब, Calculation सोपं!
बिहारच्या पाटणा भागातील प्रसिद्ध वास्तूतज्ज्ञ केपी सिंह सांगतात की, हा अंक एखाद्या व्यक्तीसाठी इतका भाग्याचा ठरू शकतो की, त्यामुळे पूर्ण नशीबच पालटतं. सर्व नकारात्मकता दूर होऊन आयुष्य सकारात्मकतेने लख्ख उजळून निघतं. 
advertisement
2/5
आपला एंजल नंबर कोणता आहे, हे काढण्याचं गणित अगदी सोपं असतं. जर एखाद्या व्यक्तीचा जन्म 1982 साली झाला असेल. तर या सर्व अंकांची बेरीज करा. म्हणजेच 1+9+8+2=20 असं उत्तर येईल. तुम्ही पुरुष असाल तर पुढे 2+0=2 असं गणित करा. जे उत्तर आलंय त्याला 11 मधून वजा करा. म्हणजे 11-2= 9. याचा अर्थ असा की, तुमचा एंजल नंबर आहे 9. 
advertisement
3/5
तुम्ही स्त्री आहात आणि तुमचा जन्म 1982 साली झाला असेल तर या सर्व अंकांची जी बेरीज आली आहे त्यात अधिक 1 करा. म्हणजे 20+1=21. उत्तर आहे 21. आता 2+1=3 असं गणित करून 11 मधून 3 वजा करा. उत्तर येईल 8. म्हणजेच 8 हा तुमचा एंजल नंबर आहे. 
advertisement
4/5
केपी सिंह असंही सांगतात की, पुरुष असाल तर तुमचा एंजल नंबर डाव्या तळहातावर मध्यभागी लिहा. त्यासाठी हिरव्या शाईचा पेन वापरा आणि त्या अंकाभोवती एक गोल करा. महिला असाल तर एंजल नंबर डाव्याच तळहातावर हिरव्या शाईने लिहा आणि त्याभोवती गोल करा. असं केल्याने 24 तासांतच तुमच्यासोबत काहीतरी सकारात्मक घडेल, असं केपी सिंह सांगतात. 
advertisement
5/5
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Numerology: जन्मतारीख नाही 'हा' अंक चमकवतो नशीब, Calculation सोपं!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल