3 ग्रहांच्या युतीतून निर्माण झालाय खास योग, तीन राशींवर होऊ शकतो पैशांचा वर्षाव!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
ज्योतिषशास्त्रात ग्रह-तारे अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जातात. पंचांगानुसार, 10 मे रोजी बुध ग्रहाचा मेष राशीत प्रवेश झाला. आता 31 मेपर्यंत हा मुक्काम असाच राहिल. (सर्वेश श्रीवास्तव, प्रतिनिधी / अयोध्या)
advertisement
1/5

अयोध्येतील ज्योतिषी पंडित कल्की राम यांनी सांगितलं की, एका ठराविक वेळेनंतर एक ग्रह एका राशीतून बाहेर पडून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. आता 10 मे रोजी बुध ग्रहाचा मीन राशीतून मेष राशीत प्रवेश झाला. तिथं सूर्य आणि शुक्र आधीपासूनच विराजमान होते. या 3 ग्रहांच्या युतीतून लक्ष्मी-नारायण योग निर्माण झालाय. हा योग 3 राशींसाठी अत्यंत लाभदायी ठरणार आहे.
advertisement
2/5
मिथुन : आपल्यासाठी हा योग प्रचंड फायद्याचा आहे. विशेषतः करियरमध्ये लाभ होईल. आपली आर्थिक स्थिती भक्कम होईल. व्यवसायातला नफा वाढेल, आरोग्य उत्तम साथ देईल. नोकरीतही मनासारखं वातावरण असेल.
advertisement
3/5
कुंभ : आपल्यासाठी हा योग अत्यंत प्रगतीचा आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे वैवाहिक जीवनातल्या अडचणी दूर होतील. दाम्पत्य जीवनात सुख येईल. आरोग्यासंबंधित समस्या दूर होतील. हाती घ्याल त्या कामात यश मिळेल.
advertisement
4/5
मीन : या योगामुळे आपला <a href="https://news18marathi.com/photogallery/religion/shani-has-made-an-amazing-coincidence-the-whole-year-is-lucky-for-4-zodiac-signs-l18w-mhij-1179743.html">जबरदस्त फायदा</a> होणार आहे. आपला आत्मविश्वास वाढेल, ज्याचा उपयोग करियरमध्ये होईल. विविध आव्हानं पार करण्यासाठी आपण सक्षम व्हाल. <a href="https://news18marathi.com/religion/lakshmi-comes-home-is-there-a-specific-auspicious-time-for-goddess-to-enter-the-house-gh-mhrp-1178062.html">धनसंपत्ती</a>त वाढ होईल.
advertisement
5/5
सूचना : येथे दिलेली माहिती <a href="https://news18marathi.com/religion/">धार्मिक</a> श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
3 ग्रहांच्या युतीतून निर्माण झालाय खास योग, तीन राशींवर होऊ शकतो पैशांचा वर्षाव!