TRENDING:

PHOTOS : जंगलात आहे सहाव्या शतकातील अनोखे मंदिर, वर्षातून फक्त एकदा होते पूजा

Last Updated:
भारतामध्ये अनेक मंदिरे आहेत. त्यात भारतातील उत्तराखंड राज्याला देवभूमी म्हटले जाते. याच देवभूमीमध्ये एक अनोखे असे मंदिर आहे. सहाव्या शतकात हे मंदिर तयार करण्यात आले होते. या मंदिरात वर्षातून फक्त एकदा पूजा केली जाते, असे सांगितले जाते. नेमका या मंदिराचा इतिहास काय आहे, हे जाणून घेऊयात. (सोनिया मिश्रा, प्रतिनिधी)
advertisement
1/7
PHOTOS : जंगलात आहे सहाव्या शतकातील अनोखे मंदिर, वर्षातून फक्त एकदा होते पूजा
उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात अनेक मंदिरे आहेत. या मंदिरांची अशी स्वतःची श्रद्धा आहे. वर्षभर ही मंदिरे भाविकांसाठी खुली असतात. मात्र, या सर्वांमध्ये एक मंदिर असे आहे, जिथे वर्षभरात फक्त रक्षाबंधनाच्या दिवशीच विशेष पूजेचे आयोजन केले जाते. रक्षाबंधनाच्या दिवशी या मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळतात.
advertisement
2/7
चमोली जिल्ह्याच्या उर्गम घाटीहू 12 किमी पायी यात्रा केल्यावर बांगा गाव याठिकाणी भगवान विष्णुला समर्पित वंशीनारायण मंदिर स्थित आहे. हे मंदिर सुंदर अशा जंगलाच्या आत आहे. हे मंदिर 12 महिने भाविकांसाठी खुले असते. मात्र, रक्षाबंधनाच्या दिनाचे याठिकाणी विशेष असे महत्त्व आहे.
advertisement
3/7
या परिसरातील भाविक याठिकाणी देवाला रक्षासूत्र बांधतात आणि सण साजरा करतात. स्कंदपुराण, पद्मपुराण आणि श्रीमद् भागवत कथेनुसार, भगवान विष्णूने येथे वामन अवतार घेतला होता आणि तीन पग (पाऊल) मध्ये राजा बलीकडे दक्षिणेत तिन्ही लोकांना मागितले आणि त्यांना पाताळात पाठवले होते. त्यामुळे राजा बळीचा अहंकार धुळीस मिळाला, असे सांगितले जाते.
advertisement
4/7
वंशीनारायण मंदिर सहाव्या शतकात राजा यशोधवल यांच्या काळात बांधले गेले. अशी मान्यता आहे की, या मंदिरात देव ऋषी नारद हे 364 दिवस भगवान विष्णूची पूजा करतात आणि देवर्षी एका दिवसासाठी कुठेतरी निघून जातात आणि त्याच दिवशी लोकांना पूजा करण्याचा अधिकार मिळतो.
advertisement
5/7
सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक रहिवासी रघुवीर सिंह नेगी सांगतात की, मंदिराचे दरवाजे 12 महिने उघडे राहतात. तसेच रक्षाबंधनाच्या दिवशी मंदिरात एक विशेष प्रकारची पूजा केली जाते.
advertisement
6/7
ही पूजा कलगोठचे क्षत्रिय जातीमधील ग्रामीण पुजारी करतात. तसेच रक्षाबंधनाच्या दिवशी मंदिरात शिवाची पूजा केली जाते. तुम्ही वंशीनारायण यात्रेदरम्यान, ग्राम पंचायत देवग्राम याठिकाणी होमस्टे मध्ये राहू शकतात.
advertisement
7/7
याठिकाणी नदीकुंड ट्रॅकिंग अँड अ‍ॅडव्हेंचर्स ग्रुप देवग्राम ट्रॅकिंग संदर्भातील सर्व सामान, गाईड, पोटर उपलब्ध करुन देतात. यासाठी तुम्ही 9412964230 9761566252 या क्रमाकांवर संपर्क साधू शकतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
PHOTOS : जंगलात आहे सहाव्या शतकातील अनोखे मंदिर, वर्षातून फक्त एकदा होते पूजा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल