9741700000... IPL ठरतीये BCCI साठी सोन्याचं अंडं देणारी कोंबडी, पाहा किती मिळतात पैसे?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
IPL is Golden Goose for BCCI : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 9741.7 कोटी रुपयांचा विक्रमी महसूल नोंदवला आहे. याआधी एवढी रक्कम कधीच कमवली नव्हती.
advertisement
1/7

बीसीसीआयला सोन्याचे दिवस आहे ते आयपीएल सुरू झाल्यापासून... त्यावर मोहोर उमटवणारा एक रिपोर्ट समोर आला आहे. त्यामुळे बीसीसीआय आयपीएल सोन्याचं अंडं देणारी कोंबडी आहे, असं म्हणावं लागेल.
advertisement
2/7
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 9741.7 कोटी रुपयांचा विक्रमी महसूल नोंदवला आहे. याआधी एवढी रक्कम कधीच कमवली नव्हती.
advertisement
3/7
यापैकी, इंडियन प्रीमियर लीग 59 टक्के योगदानाने कमाईचा प्रमुख स्त्रोत ठरला आहे. रेडिफ्यूजनच्या अहवालानुसार, आयपीएलमधून 5,761 कोटी रुपये मिळाले.
advertisement
4/7
तर नॉन-आयपीएल मीडिया राईट्समधून बीसीसीआयने अतिरिक्त 361 कोटी रुपये कमावले आहेत. त्यामुळे बीसीसीआयसाठी आयपीएल महत्त्वाची आहे, असं म्हणता येईल.
advertisement
5/7
सध्याचे इंडियन प्रीमियर लीगच्या मीडिया हक्कांचे (media rights) मूल्यांकन 48,390 कोटी इतके आहे. हे मागील पाच वर्षांच्या चक्रापेक्षा तिप्पट वाढलं आहे.
advertisement
6/7
आयसीसी स्पर्धांसाठी 80 टक्कांपेक्षा जास्त महसूल भारतीय बाजारपेठेतून निर्माण होतो. महसूलाचा पुढचा सर्वात मोठा भाग आयसीसी महसुलाच्या वितरणातून येतो.
advertisement
7/7
आयपीएलच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे आणि आर्थिक यशामुळे भारतीय क्रिकेटच्या विकासाला मोठा हातभार लागत आहे, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
9741700000... IPL ठरतीये BCCI साठी सोन्याचं अंडं देणारी कोंबडी, पाहा किती मिळतात पैसे?