Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणेने पुन्हा ठोठावले BCCIचे दरवाजे, रणजीत दमदार शतक
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणेने रणजी ट्रॉफी स्पर्धेत दमदार शतक ठोकलं आहे. या त्याच्या शतकी खेळेने रणजी ट्रॉफीच्या क्वार्टर फायनल स्पर्धेत मुंबई सुस्थितीत पोहोचली आहे. मुंबईने दुसऱ्या डावात 339 धावा केल्या आहेत.
advertisement
1/7

मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणेने रणजी ट्रॉफी स्पर्धेत दमदार शतक ठोकलं आहे. या त्याच्या शतकी खेळेने रणजी ट्रॉफीच्या क्वार्टर फायनल स्पर्धेत मुंबई सुस्थितीत पोहोचली आहे. मुंबईने दुसऱ्या डावात 339 धावा केल्या आहेत.
advertisement
2/7
खरं तर दुसऱ्या डावात मुंबईची स्थिती खूपच बिकट होती. त्यावेळेस अंजिक्य रहाणेने कर्णधारपदाला साजेशी खेळी केली. अजिक्यने 108 धावा केल्या, ज्यामध्ये त्याने 13 खणखणीत चौकार खेचले आहे. या त्याच्या खेळीने त्याने बीसीसीआयचे दरवाजे पुन्हा ठोठावले आहेत.
advertisement
3/7
अजिंक्यने प्रथम श्रेणी क्रिकेटमधील 41वे आणि रणजी करंडक स्पर्धेतील 17 वे शतक पुर्ण केले आहे. अजिंक्यच्या या खेळीने मुंबईने हरियाणासमोर विजयासाठी 339 धावांचे आव्हान ठेवलं आहे.
advertisement
4/7
खरं तर मुंबईच्या 315 धावांसमोर हरियानाने दुसऱ्या दिवसअखेर पाच बाद 263 धावांपर्यंत मजल मारली होती. पहिल्या डावातील आघाडीचे वर्चस्व मिळवण्यासाठी त्यांना केवळ 52 धावांची गरज होती आणि पाच फलंदाज शिल्लक होते.त्यावेळेस शार्दुल ठाकूरने भेदक गोलंदाजी करत हरियानाचा डाव 301 वर गुंडाळला आहे.
advertisement
5/7
त्यामुळे मुंबईला 14 धावांची आघाडी मिळाली होती. या आघाडीच्या बळावर मुंबईत मोठी धावसंख्या उभारेल अशी अपेक्षा होती. मात्र मुंबईचे काही खेळाडू झटपट बाद झाले. त्यामुळे मुंबईचा डाव बॅकफुटवर गेला होता.
advertisement
6/7
पण अजिंक्य रहाणेच्या 108 सुर्यकुमार यादवच्या 70 आणि शिवम दुबेच्या 48 धावांच्या खेळीवर मुंबईने दुसऱ्या डावात 339 धावापर्यंत मजल मारली आहे.
advertisement
7/7
आता हरियाणाला हा क्वार्टर फायनल सामना जिंकण्यासाठी 339 धावा कराव्या लागणार आहे. आता हे आव्हान हरियाणा पुर्ण करतो की मुंबई हरियाणाला रोखण्यात यशस्वी ठरतो का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणेने पुन्हा ठोठावले BCCIचे दरवाजे, रणजीत दमदार शतक