Dream11 चं सत्य आलं समोर, पोलीस कर्मचाऱ्याने सगळं सांगितलं, खरंच किती पैसे मिळतात?
- Published by:sachin Salve
- local18
Last Updated:
ध्या आयपीएल हंगाम सुरू आहे. फँटसी एप असलेल्या Dream11 मुळे एक पोलीस कर्मचारी एका रात्रीत करोडपती झाला आहे. (नूंह मेवात, प्रतिनिधी)
advertisement
1/7

कुणाचं नशीब कधी पलटेल याचा नेम नाही. अशीच एक घटना एका तरुणासोबत घडली आहे. सध्या आयपीएल हंगाम सुरू आहे. फँटसी एप असलेल्या Dream11 मुळे एक पोलीस कर्मचारी एका रात्रीत करोडपती झाला आहे. या पोलीस कर्मचाऱ्याने फक्त 39 रुपये लावले होते. 39 रुपयांमध्ये या त्याने 4 कोटी रुपये जिंकले आहे.
advertisement
2/7
हरियाणामधील नूंह जिल्ह्यातील तुसैनी गावात राहणाऱ्या पोलीस होमगार्ड जवान घनश्याम प्रजापती असं या लकी माणसाचं नाव आहे. घनश्याम यांनी शनिवारी रात्री झालेल्या रॉयल चॅलेंजर बंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स दरम्यान सामना झाला होता. या सामन्यासाठी प्रजापती यांनी ड्रीम ११ या अॅपवर 39 रुपयांमध्ये टीम लावली होती. ड्रीम ११ वर या मॅचसाठी प्राइज पूल हा १७ कोटी रुपयांचा होता.
advertisement
3/7
प्रजापती यांनी ड्रीम ११ वर ८ वेगवेगळ्या टीम बनवल्या होत्या. गावात लग्न होतं त्यामुळे त्यांनी ड्रीम११ अॅपकडे लक्ष दिलं नाही. नेहमीप्रमाणे ते झोपी गेले. सकाळी उठून पाहिलं तर अॅपमध्ये अकाऊंटमध्ये काही पैसे आल्याचं दिसलं. त्यांची टीम ही पहिली आली होती १३५६ पॉईंटची कमाई केली होती. या टीमची विनिंग रक्कम ही ४ कोटी रुपये होती. घनश्याम प्रजापती यांनी ४ कोटी रुपये जिंकले ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली.
advertisement
4/7
प्रजापती यांच्या घरी गावकऱ्यांनी एकच गर्दी केली. शेजारी आणि नातेवाईकांनी प्रजापती यांचं अभिनंदन केलं. जो तो त्यांना भेटायला आला, नेमकं केलं कसं अशी विचारणा करत होते. घनश्याम प्रजापती यांचं गावातील लोकांनी फेटा बांधून अभिनंदन केलं. ३३ वर्षीय प्रजापती हे पोलीस होमगार्ड आहे. पुनहाना शहरात त्यांची ड्युटी असते. २०१५ मध्ये प्रजापती हे पोलीस दलात सामील झाले होते. त्यांचे वडील हे मजूर आहे.
advertisement
5/7
मागील अनेक वर्षांपासून ते ड्रीम ११ वर टीम लावत होते. सुरुवातील त्यांनी काही रक्कम जिंकली होती. पण कधीही इतकी मोठी रक्कम जिंकली नव्हती. पण यावेळी त्यांनी ४ कोटी जिंकले आहे. ४ कोटी रुपये जिंकले असले तर त्याच्यावर ३० टक्के ही फी आकारली गेली. त्यामुळे त्यांच्या खात्यात 2 कोटी ८० लाख रुपये आले. 24 तासांनंतर हे पैसे काढता येणार आले. याआधीही मेवात परिसरातील एक तरुणाने ड्रीम ११ वर १ ० टीम लावून कोट्यवधी रुपये जिंकले होते.
advertisement
6/7
४ कोटी जिंकल्यानंतर पोलीस दलातील नोकरी सोडून देणार का? अशी विचारणा केली असता, घनश्याम प्रजापती यांना नकार दिला. मला अजूनही विश्वास बसत नाही. पैसे जिंकलो असलो तरी नोकरी करणार आहे, पोलीस दलाची नोकरी मी खूप मेहनतीने मिळवली, त्यामुळे नोकरी सोडणार नाही. या पैशांमधून मी नवीन घर घेणार आहे, असं घनश्याम प्रजापती यांनी सांगितलं.
advertisement
7/7
Disclaimer: ( वरील दिलेली माहिती ही व्हायरल झालेल्या कंटेटवर आधारीत आहे. यात प्रत्यक्ष व्यक्तीने माहिती दिली आहे. फँटसी एपचा वापर हा आर्थिक नुकसानी कारण ठरू शकतं. त्यामुळे अशा एपचा वापर करण्याआधी विचार करावा)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Dream11 चं सत्य आलं समोर, पोलीस कर्मचाऱ्याने सगळं सांगितलं, खरंच किती पैसे मिळतात?