Sachin Tendulkar च्या पोस्टने क्रिडाविश्वात खळबळ, क्रिकेटच्या देवाला अजूनही दुखावतेय 25 वर्षांपूर्वीची जखम
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Sachin Tendulkar Steve Bucknor : क्रिकेटचा देव सचिन तेंडूलतर आणि अंपायर स्टीव्ह बकनर यांच्यातील वाद सर्वश्रूत आहे. गेल्या 25 वर्षापासून सुरू असलेला हा वादाला आता खुद्द क्रिकेटच्या देवाने खतपाणी घातलंय. सचिनने बोचरी टीका करणारी एक पोस्ट शेअर केलीये.
advertisement
1/7

सचिन तेंडूलकर म्हणजे शांत स्वभावाचा खेळाडू.. सचिन कधीही कोणावर रागावत नाही, ना तो कोणावर चिडतो. सचिनने आपल्या क्रिकेट कारकीर्दीत कुणालाही दुखावलं नाही. मात्र, सचिनचा स्टीव्ह बकनर यांच्याशी झालेला वाद कुणीही विसरलं नसेल.
advertisement
2/7
अशातच सचिन तेंडुलकरच्या एका सोशल मीडिया पोस्टने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. सचिनने एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो तीन मोठ्या झाडांसमोर फलंदाजी करताना दिसत आहे.
advertisement
3/7
कोणत्या अंपायरमुळे स्टंप इतका मोठा वाटला? असा बोचरा सवाल कॅप्शनमध्ये सचिन तेंडूलकरने त्याच्या चाहत्यांना विचारलाय. त्यामुळे सचिनचा रोख कोणाकडे होता? असा सवाल विचारला जाऊ लागला आहे.
advertisement
4/7
सचिनची पोस्ट म्हणजे बकनरने घेतलेल्या वादग्रस्त निर्णयांचा स्पष्ट संदर्भ आहे, असं चाहत्यांचं मत आहे. 1990 आणि 2000 च्या दशकात बकनरचे सचिन तेंडुलकरसोबत चांगले संबंध नव्हते. अशातच आता 25 वर्षांपूर्वीची जखम पुन्हा सचिनला दुखावते का? असा सवाल देखील नेटकरी विचारतायेत.
advertisement
5/7
सचिनने बकनर यांच्या निर्णयावर अनेकदा टीका केली आहे. 2008 मध्ये भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान बकनरच्या काही निर्णयांवर जोरदार टीका झाली होती. तर 2003 मध्ये गाबा कसोटी सामन्यात सचिनला आऊट दिल्याने देखील वाद पेटला होता.
advertisement
6/7
2005 मध्ये कोलकात्याच्या ईडन गार्डन्स येथे भारत आणि पाकिस्तान सामन्यात देखील बकनर यांच्या निर्णयावरून वाद पेटला होता. तर ऑस्ट्रेलिया दौऱ्यात बकनर यांच्यावर टीका देखील अनेकदा झाली आहे.
advertisement
7/7
दरम्यान, टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना सचिनच्या पोस्टने क्रिडाविश्वात खळबळ उडवली आहे. सचिनने पुन्हा बकनर यांना चिमटे काढलेत. बकनर यांनी देखील निवृत्तीच्या आधी आपल्या चुका मान्य केल्या होत्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Sachin Tendulkar च्या पोस्टने क्रिडाविश्वात खळबळ, क्रिकेटच्या देवाला अजूनही दुखावतेय 25 वर्षांपूर्वीची जखम