TRENDING:

Mohammad Shami चा आरोप खोटा, एका नकाराने करिअर संपवलं? 'या' कारणामुळे टीम इंडियातून बाहेर

Last Updated:
बऱ्याच काळापासून मोहम्मद शमी हा टीम इंडियातून बाहेर आहे. तो टेस्ट टिमचाही भाग नव्हता. अशातच आता त्याच्या टीम इंडियामध्ये परत स्थान मिळवण्याचा आशा कुठे तरी धूसर होताना दिसत आहेत.
advertisement
1/7
मोहम्मद शमीच्या एका नकाराने करिअर संपवलं? 'या' कारणामुळे टीम इंडियातून बाहेर
बऱ्याच काळापासून मोहम्मद शमी हा टीम इंडियातून बाहेर आहे. तो टेस्ट टिमचाही भाग नव्हता. अशातच आता त्याच्या टीम इंडियामध्ये परत स्थान मिळवण्याचा आशा कुठे तरी धूसर होताना दिसत आहेत.
advertisement
2/7
अशात एक मोठी बातमी समोर येत आहे, मोहम्मद शमीला टीम इंडियामध्ये स्थान का मिळत नाहीय याबद्दल एक खुलासा करण्यात आला आहे. मोहम्मद शमी जवळजवळ अडीच वर्षांपासून भारतासाठी कसोटी क्रिकेटपासून दूर आहे. दुखापतीमुळे तो पहिल्या दीड वर्षापासून कसोटी क्रिकेटपासून दूर राहिला.
advertisement
3/7
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी मोहम्मद शमीला अलीकडेच भारतीय संघातून वगळण्यात आले होते. त्याला यापूर्वी वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतूनही वगळण्यात आले होते. 2023 च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर तो भारतासाठी एकही कसोटी सामना खेळलेला नाही.
advertisement
4/7
आता, एका अहवालात म्हटले आहे की इंग्लंड दौऱ्यासाठी त्याच्याशी संपर्क साधण्यात आला होता, पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, निवडीबाबत शमीचा सल्ला घेण्यात आला नाही हा शमीचा आरोप खोटा आहे.
advertisement
5/7
त्याच्याशी अनेक वेळा बोलण्यात आले. एका सूत्राचा हवाला देत, अहवालात म्हटले आहे की, "राष्ट्रीय निवडकर्त्यांनी आणि बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स सपोर्ट स्टाफने शमीशी बोलण्यासाठी अनेक वेळा फोन केला.
advertisement
6/7
निवड समितीच्या एका वरिष्ठ सदस्याने शमीला त्याच्या तंदुरुस्तीबद्दल विचारपूस करण्यासाठी अनेक संदेश पाठवले आणि इंग्लंड दौऱ्यावर पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत खेळू शकेल का हे पाहण्यासाठी इंग्लंड लायन्सविरुद्ध भारत अ संघाकडून किमान एक सामना खेळण्याची विनंती केल्याचे सांगितले.
advertisement
7/7
पीटीआयने वृत्त दिले आहे की शमीने उत्तर दिले की त्याला त्याच्या वर्क लोडवर काम करण्याची आवश्यकता आहे आणि या दौऱ्यासाठी त्याचा विचार केला जाऊ नये. सूत्रानुसार, त्यामुळे शमीचा सल्ला घेण्यात आला नाही असा आभास निर्माण करणे चुकीचे होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Mohammad Shami चा आरोप खोटा, एका नकाराने करिअर संपवलं? 'या' कारणामुळे टीम इंडियातून बाहेर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल