आयुष्यात पाहिलं नसेल असं लग्न! Wedding Photo पाहूनच अंगावर शहारा येईल
- Published by:Priya Lad
Last Updated:
एका कपलनं हटके लग्न करण्याच्या नादात असा लग्नसोहळा केला आहे की तुम्ही त्याचा स्वप्नातही विचार केला नसेल. खरंतर ड्रिम वेडिंगच वाटावं असं हे लग्न आहे. फोटो पाहूनच सर्वजण थक्क झाले आहेत.
advertisement
1/7

आपलं लग्न हटके असावं असं प्रत्येकाला वाटतं. <a href="https://news18marathi.com/tag/wedding-news/">कुणी लग्न वेडिंग हॉलमध्ये, कुणी हॉटेल, कुणी खुल्या मैदानात, कुणी समुद्रकिनाऱ्यावर करतं. आता तर डेस्टिनेशन वेडिंगही होतात</a>. पण एका कपलनं अशा ठिकाणी लग्न केलं आहे, ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल.
advertisement
2/7
तुम्ही बरीच लग्न पाहिली असतील. पण सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या अनोख्या लग्नाचे फोटो पाहिल्यानंतर आयुष्यात आपण असं लग्न कधी पाहिलं नाही, असंच म्हणाल. कारण हे लग्न चक्क बर्फात झालं आहे.
advertisement
3/7
स्वित्झर्लंडच्या जर्मेटमध्ये हा लग्नसोहळा पार पडला आहे. समुद्रतळापासून 2,222 मीटर उंचावर बर्फाळ प्रदेशात डोंगरावर हे लग्न झालं. जे पाहूनच आपल्या अंगावर शहारा येतो.
advertisement
4/7
बॅकग्राऊंडला बर्फाचा डोंगर आहे. शिवाय लग्नातील सर्व डेकोरेशनही तशाच पद्धतीनं बनवण्यात आलं आहे. व्हायोलिन वादक स्नो एंजल्सच्या रूपात आहेत. लग्नातील स्टाफनंही आइस-क्यूब हेडगियर, आइस थीमवाला ड्रेस घातलेला आहे. ड्रिंकसुद्धा आइस क्युब ट्रेमधून सर्व्ह करण्यात आला.
advertisement
5/7
लग्न म्हटलं की नवरा-नवरीची एंट्रीही खास असते. तुम्ही विश्वासही केला नसेल अशी एंट्री इथं नवरीनं घेतली. नवरी चक्क बर्फाच्या तुकड्यातून आली. लग्नाचे फोटो काढतानाही कपल बर्फाच्या आत पोझ देताना दिसतं.
advertisement
6/7
लग्नाचे हे फोटो पाहिल्यावर त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. ग्रँड वेडिंग, राजा-राणी लग्न करत आहेत, असं वाटत आहे, हे एकदम वेगळं लग्न आहे, हे देवा हे लग्न इतकं सुंदर आहे की काही बोलण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत, मी पहिल्यांदाच असं अद्भुत लग्न पाहिलं, अशा प्रतिक्रिया युझर्सच्या आल्या आहेत. एका युझरने तर आपणही भविष्यात असंच लग्न करणार असल्याचं म्हटलं आहे.
advertisement
7/7
lebaneseweddings नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो पोस्ट करण्यात आले आहेत. तुम्हाला हा लग्नसोहळा कसा वाटला आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. (सर्व फोटो : lebaneseweddings/इन्स्टाग्राम)