Mahakumbh 2025 : विवस्त्र असणारे नागा साधू कुंभमेळ्यातून जाताना लंगोट का घालतात?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Mahakumbh Naga Sadhu Life : 29 जानेवारीला सुरू झालेल्या महाकुंभ आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. वसंत पंचमीला शाही स्नानानंतर नागा साधू आता परतीच्या मार्गावर आहेत. यावेळी तुम्हाला एक बदल आवर्जून दिसेल. कुंभमेळ्यात आलेले नागा साधू लंगोट घालून जातात
advertisement
1/7

शरीरावर एकही वस्त्र नाही, शरीराला भस्म आणि हातात त्रिशूल, सामान्यपणे नागा साधू अशा अवस्थेत दिसतात पण कुंभमेळ्यातून जेव्हा ते जातात तेव्हा त्यांच्यात एक बदल दिसतो. त्यांच्या शरीरावर एक वस्त्र लंगोट असतं.
advertisement
2/7
नागा साधू जुना आखाडा, अटल आखाडा, महानिर्वाणी आखाडा अशा अनेक आखाड्यांशी जोडलेले असतात. आखाड्यांमध्ये नागा साधूंसाठी काही कडक नियम असतात.
advertisement
3/7
जोपर्यंत ये साधू कुंभमेळ्यात असतात तेव्हा ते नग्नच असतात कोणतेच कपडे घालत नाहीत. पण नियमानुसार जेव्हा ते कोणत्याही धार्मिक, सामाजिक कार्यक्रमासाठी सार्वजनिक ठिकाणी जातात तेव्हा त्यांना लंगोट किंवा साधू वस्त्र घालावी लागतात. यामागे अनेक अध्यात्मिक, सामाजिक आणि पारंपारिक कारणं आहेत.
advertisement
4/7
लंगोट फक्त एक वस्त्र नाही तर आत्मसंयमाचं प्रतीक आहे. नागा साधूंचं आयुष्य सांसरिक सुखं आणि भौतिक इच्छांच्या पलीकडे आहे, त्यांच्या जीवनाचा उद्देश साधना आणि तपस्या आहे, ही आठवण त्यांना करून देतं. आपली संस्कृती आणि प्राचीन परंपरांचं पालन करतात.
advertisement
5/7
आधुनिक समाजात सार्वजनिक रूपात नग्नता स्वीकार्य नाही. सामाजिक आयुष्यात त्यांना समाजाच्या मर्यादेचं पालन करावं लागतं. त्यामुळे जेव्हा ते सांसारिक दुनियेत असतात तेव्हा लंगोट किंवा कमीत कमी काहीतरी वस्त्र धारण करणं गरजेचं मानलं जातं.
advertisement
6/7
नागा साधू कुंभमेळा आणि इतर कोणत्याही वेळी निर्वस्त्र राहतात. जेव्हा ते सगळ्यांसमोर येतात तेव्हा ते वस्त्र म्हणून लंगोट बांधतात.
advertisement
7/7
कुंभमेळा संपल्यानंतर नागा साधू आपल्या आखाड्यात जातात. जिथं आपल्या शिष्यांना दीक्षा देतात, धार्मिक अनुष्ठान करतात आणि साधना करतात. त्यानंतर हिमालय, गंगोत्री, यमुनोत्री, अमरकंटक, गिरनार आणि नेपालसारख्या एकांत तपस्थील जातात. तिथं ते कठोर तपस्या आणि साधान करतात. त्यामुळे त्यांची अध्यात्मिक प्रगती होईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Mahakumbh 2025 : विवस्त्र असणारे नागा साधू कुंभमेळ्यातून जाताना लंगोट का घालतात?