TRENDING:

Pune News: पुणेकरांना मिळणार मोफत वस्तू, शहरात RRR सेंटर सुरू, नेमकी योजना काय?

Last Updated:

Pune News: पुण्यात प्रशासनाने एक खास उपक्रम सुरू केला असून गरजूंना मोफत वस्तू मिळणार आहेत. याच आरआरआर उपक्रमाबाबत जाणून घेऊ.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे: स्वच्छ भारत मिशनच्या अंतर्गत पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पुढाकाराने शहरात आरआरआर (Reduce-Reuse-Recycle) केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. शहरातील आठही क्षेत्रीय कार्यालयांच्या प्रभागांमध्ये उभारलेल्या या केंद्रांमार्फत नागरिकांकडून घरात न वापरण्यात येणाऱ्या पण उपयुक्त वस्तू संकलित करून त्या गरजू लोकांपर्यंत पोहोचवल्या जात आहेत. या उपक्रमामुळे केवळ शहरातील कचऱ्याचे प्रमाण कमी होत नाही, तर समाजातील गरजूंना आवश्यक वस्तू मिळण्यास देखील मदत होत आहे.
Pune News: पुणेकर गरजूंना मिळणार मोफत वस्तू, शहरात RRR सेंटर सुरू, नेमकी योजना काय?
Pune News: पुणेकर गरजूंना मिळणार मोफत वस्तू, शहरात RRR सेंटर सुरू, नेमकी योजना काय?
advertisement

गरजू लोकांना वस्तू मोफत उपलब्ध

महापालिका आयुक्त शेखर सिंह व अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपायुक्त सचिन पवार यांच्या देखरेखीखाली महापालिकेच्या आरआरआर केंद्रांमध्ये संकलित साहित्याचे प्रथम वर्गीकरण केले जाते. या प्रक्रियेत उपयुक्त वस्तू गरजू नागरिकांना मोफत दिल्या जातात, तर उर्वरित साहित्य रिसायकल प्रक्रियेद्वारे नव्याने वापरासाठी तयार केले जाते. या पद्धतीमुळे शहरातील कचऱ्याचे प्रमाण कमी होते आणि समाजातील गरजू लोकांना आवश्यक वस्तू मिळतात.

advertisement

Pune Mhada Lottery : म्हाडाची मोठी घोषणा! पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार साकार, म्हाडातर्फे 4186 घरांची लॉटरी जाहीर

आरआरआर सेंटरवर कोणत्या वस्तू जमा करू शकता?

महापालिकेच्या आरआरआर केंद्रांमध्ये नागरिक घरातील न वापरल्या जाणाऱ्या पण उपयुक्त वस्तू जमा करू शकतात. यामध्ये जुनी पण वापरण्यायोग्य पुस्तके, वह्या, शालेय साहित्य, चांगल्या स्थितीतील कपडे, चादरी, मुलांची खेळणी, शैक्षणिक साधने, घरगुती भांडी, फर्निचर, घरगुती वस्तू, छोटे-मोठे इलेक्ट्रॉनिक उपकरणे, चपला व इतर उपयुक्त साहित्याचा समावेश आहे. जमा केलेल्या वस्तूंचे वर्गीकरण करून उपयुक्त वस्तू गरजू नागरिकांना मोफत उपलब्ध करून दिल्या जातात, तर उर्वरित साहित्य रिसायकल प्रक्रियेद्वारे नव्याने वापरासाठी तयार केल्या जातात.

advertisement

आरआरआर सेंटरच्या माध्यमातून गरजूंना उपयुक्त वस्तू मोफत उपलब्ध करून दिल्या जात आहेत. या उपक्रमामुळे पुनर्वापराची संस्कृती शहरात रुजत आहे आणि हे सेंटर शहराला शाश्वत व पर्यावरणपूरक बनविण्यास मदत करू शकतात, असे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे उपायुक्त सचिन पवार यांनी सांगितले.

मराठी बातम्या/पुणे/
Pune News: पुणेकरांना मिळणार मोफत वस्तू, शहरात RRR सेंटर सुरू, नेमकी योजना काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल