तलाठ्यापासून ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत! राज्य सरकारकडून नवीन नियमावली लागू होणार

Last Updated:

Agriculture News : महसूल विभागाच्या कामकाजात गेल्या काही वर्षांत संगणकीकरण झाले असले तरी, दप्तर तपासणीची पारंपरिक पद्धत हळूहळू दुर्लक्षित झाली. यामुळे तलाठ्यांपासून प्रांताधिकाऱ्यांपर्यंतच्या कामकाजावर नियंत्रण सैलावले आणि अनेक प्रकरणांत गोंधळ व गैरव्यवहार वाढले.

Agriculture News
Agriculture News
मुंबई : महसूल विभागाच्या कामकाजात गेल्या काही वर्षांत संगणकीकरण झाले असले तरी, दप्तर तपासणीची पारंपरिक पद्धत हळूहळू दुर्लक्षित झाली. यामुळे तलाठ्यांपासून प्रांताधिकाऱ्यांपर्यंतच्या कामकाजावर नियंत्रण सैलावले आणि अनेक प्रकरणांत गोंधळ व गैरव्यवहार वाढले. या समस्येला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने आता ऑनलाइन दप्तर तपासणी अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. ही नवीन प्रणाली येत्या सेवा पंधरवड्यात संपूर्ण राज्यात लागू होणार असून, तपासणी न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर थेट कारवाई केली जाणार आहे.
काय आहे दप्तर तपासणी?
दप्तर तपासणी म्हणजे महसूल अधिकाऱ्यांनी केलेल्या कामाचे परीक्षण. वारस नोंदी, फेरफार नोंदी, हक्क हस्तांतरण, भोगवटा वर्ग बदल, शर्तभंग, गायरानवरील अतिक्रमण, क्षेत्रफळ दुरुस्ती यांसारख्या प्रकरणांची योग्य नोंद व निर्णय यासाठी नियमित तपासणी आवश्यक असते. २०१२ पूर्वी ही प्रक्रिया काटेकोरपणे केली जात होती. मात्र, संगणकीकरणानंतर याकडे दुर्लक्ष झाले.
संगणकीकरणानंतरचा गोंधळ
ऑनलाइन दप्तर तपासणीची तरतूद असूनही बंधनकारक नसल्याने अधिकाऱ्यांवर नियंत्रण राहिले नाही. परिणामी, काहींनी याचा गैरवापर केला. उदाहरणार्थ, पुणे जिल्ह्यात महसूल अधिनियमाच्या कलम १५५ चा मोठ्या प्रमाणावर गैरवापर झाल्याचे उघड झाले. तक्रारी वाढल्यानंतर नाशिक विभागीय आयुक्तांच्या समितीने २०२० ते २०२५ दरम्यान दिलेल्या ३८ हजारांहून अधिक आदेशांची तपासणी केली. यातील सुमारे ४,५०० आदेशांची मूळ फाइल मागवून फेरपडताळणी करण्याचे आदेश दिले असून, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची शक्यता आहे.
advertisement
नवीन प्रणाली कशी काम करेल?
राज्य सरकारने विकसित केलेल्या ऑनलाइन दप्तर तपासणी प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि तलाठी यांच्या कामाची नियमित तपासणी होईल. प्रणाली यादृच्छिक पद्धतीने तपासणीसाठी प्रकरणे निवडेल. तपासणीनंतर त्याची नोंद डिजिटल स्वरूपात राहील. तपासणीचे सर्व डेटा राज्य स्तरावरील डॅशबोर्डवर उपलब्ध राहील.
यामुळे तपासणी पारदर्शक झाली का? निर्णय योग्य आहेत का? याची थेट पडताळणी करता येईल.
advertisement
कारवाईची तरतूद
जर तपासणीदरम्यान अनियमितता आढळली, तर संबंधित अधिकारी आणि त्यांच्या वरिष्ठांवरही थेट कारवाई केली जाईल. जिल्हाधिकाऱ्यांच्या तपासणीवर विभागीय आयुक्तांचे नियंत्रण राहणार असून, राज्य सरकारलाही संपूर्ण माहिती एकत्रित स्वरूपात मिळेल.
पारदर्शकतेकडे वाटचाल
नवीन प्रणालीमुळे महसूल विभागातील कामकाज अधिक पारदर्शक होणार आहे. महसूल विभागाशी संबंधित वारस नोंदी, फेरफार, गायरान अतिक्रमण यांसारखी संवेदनशील प्रकरणे योग्य प्रकारे तपासली जातील. त्यामुळे बेकायदेशीर कामकाजाला आळा बसेल आणि सामान्य नागरिकांना अन्यायकारक निर्णयांचा फटका बसणार नाही.
मराठी बातम्या/कृषी/
तलाठ्यापासून ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत! राज्य सरकारकडून नवीन नियमावली लागू होणार
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement