Govinda-Sunita : 'फक्त सोनालीच वाचली...', नॅशनल TV वर सुनितानं सांगितलं गोविंदाचं खळबळजनक सीक्रेट

Last Updated:

Sunita - Govinda Ahuja : सुनिता अहुजा नुकतीच एका शोमध्ये पोहोचली होती. तिथे तिनं पुन्हा एकदा तिच्या आणि गोविंदाच्या नात्याबद्दल नवा खुलासा केला. गोविंदाच्या फ्लर्सट करण्याच्या सवयीबद्दल ती बोलली.

News18
News18
मुंबई : गोविंदा आणि सुनीता आहुजाच्या घटस्फोटाच्या अफवा गणेश चतुर्थीच्या दिवशी पूर्णपणे संपल्या. दोघेही लोकांसमोर एकत्र आले. दोघांमध्ये सगळं काही आलबेल असल्याचं पाहायला मिळालं.  सुनीता अलीकडेच कलर्सच्या 'पती पत्नी और पंगा - जोडीयों का रिअॅलिटी चेक' या रिअॅलिटी शोमध्ये दिसली. दोघांनाही पडद्यावर एकत्र पाहून शोमध्ये उपस्थित असलेले प्रेक्षकच नव्हे तर चाहतेही खूप आनंदी झाले. शोचे होस्ट मुनावर फारुकी यांनी गोविंदा आणि सुनीतासोबत खूप मजा केली. गोविंदा आणि सुनीता यांनीही सोनाली बेंद्रेसोबत खूप मजा केली. सुनीतानेही गोविंदाबद्दल धक्कादायक खुलासे केले.
मुनावर फारुकी यांनी सुनीताला शोमध्ये नाचण्यासाठी बोलावतो आणि दोघे बीबी नंबर वन या गाण्यावर नाचतात. तेव्हा सुनीता म्हणाली, "मी तुझी बीबी नंबर 1 नाहीये की तू माझ्यासोबत असा नाचत आहेस. मी तर गोविंदाची बीबी नंबर 1 आहे." तेवढ्यात कोणीतरी तिला बोलतं, मॅम तुमच्यासोबत राहून गोविंदा सरही टू जी झालेत. त्यावर सुनिता म्हणते, घरवालीच्या समोर सगळेच टू जी असतात. बाहेरवालीसोबत सगळे जेन झी होऊन जातात.
advertisement
एवढेच नाही तर तिने गोविंदाच्या अफेअर आणि फ्लर्टिंगबद्दल बोलून सर्वांना आश्चर्यचकित केलं. सुनीता म्हणाली, "गोविंदा जवळजवळ प्रत्येक अभिनेत्रीसोबत फ्लर्ट करायचा पण सोनाली बेंद्रे ही एकमेव अभिनेत्री होती जिच्यासोबत त्याने कधीही फ्लर्ट केलं नाही."
advertisement
सुनीता आहुजाच्या या खुलाशाने शोमधील स्पर्धकांना आणि प्रेक्षकांना आश्चर्यचकित केले. यादरम्यान सोनाली बेंद्रे स्टेजवर लाजताना दिसली. सुनीता आणि सोनालीमध्ये डान्स स्पर्धा देखील झाली. दोघी गोविंदाच्या 'मैं तो रास्ते से जा रहा था' या सुपरहिट गाण्यावर नाचल्या.



 










View this post on Instagram























 

A post shared by ColorsTV (@colorstv)



advertisement
यानंतर ईशा मालवीयाने 'मॅरेज रिपोर्ट कार्ड' राऊंड दरम्यान सुनीता आहुजाला तिचा पती गोविंदाला रेटिंग देण्यास सांगितले. सुनीता यांनी गोविंदाच्या विसरण्याच्या सवयी आणि जबाबदारीसाठी 10 पैकी 7 गुण दिले. सुनीता यांनी गोविंदाच्या निष्ठेलाही रेटिंग दिले. या प्रकरणात तिने गोविंदाला 6 गुण दिले. सुनीता यांच्या या रेटिंगवर प्रेक्षक आश्चर्यचकित झाले.
advertisement
सुनीता आहुजा यांनीही शोमध्ये सामील होण्याचा तिचा अनुभव शेअर केला. ती म्हणाली, "पती पत्नी और पंगा या मालिकेचा भाग होणे खूप छान होतं. ती एक सुंदर आठवण होती. त्यात जुन्या आठवणी आणि विनोद होते. मला पुन्हा गोविंदाच्या गाण्यांवर नाचणे, सोनालीसोबत स्टेज शेअर करणे खूप आवडले. सोनालीसोबत घालवलेला वेळ खास होता. आम्ही हसलो आणि जुने मजेदार क्षण आठवले."
मराठी बातम्या/मनोरंजन/
Govinda-Sunita : 'फक्त सोनालीच वाचली...', नॅशनल TV वर सुनितानं सांगितलं गोविंदाचं खळबळजनक सीक्रेट
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement