Kolhapur Crime: दोघांना करायचं होतं लग्न, पण पैसे कुठून आणणार? मग 'या' जोडप्याने रचला प्लॅन अन् केला मोठा कांड!

Last Updated:

Kolhapur Crime : शहापूर भागातील तुळजा भवानी मंदिरासमोर दुचाकीवरून फिरत असलेले सिद्धांत आणि दिया पोलिसांना संशयास्पद वाटले. पोलिसांनी त्यांना...

Kolhapur Crime
Kolhapur Crime
Kolhapur Crime : लग्नासाठी पैसे कमी पडत असल्यामुळे एका जोडप्याने भरदिवसा घरफोडी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोरोची (ता. हातकणंगले) येथील विवेकानंदनगरमध्ये झालेल्या या घरफोडीप्रकरणी शहापूर पोलिसांनी मित्र आणि मैत्रिणीला अटक केली आहे. त्यांच्याकडून सोने-चांदीचे दागिने, दुचाकी आणि मोबाइल असा एकूण 4 लाख 51 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
घडले काय?
सिद्धांत श्रीकांत सगरे (वय-24, रा. कबनूर) आणि दिया सचिन गायकवाड (वय-20, रा. कोरोची) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. 7 सप्टेंबर रोजी कोरोची येथील भारती सजन ढाले यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरी झाली होती. यामध्ये सुमारे 2 लाख 87 हजार रुपयांचे दागिने चोरीला गेले होते.
पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर, शहापूर भागातील तुळजा भवानी मंदिरासमोर दुचाकीवरून फिरत असलेले सिद्धांत आणि दिया पोलिसांना संशयास्पद वाटले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता, त्यांच्या पिशवीमध्ये सोन्या-चांदीचे दागिने सापडले. कडक चौकशी केल्यानंतर, त्यांनी लग्नाचा खर्च भागवण्यासाठी कोरोची येथे चोरी केल्याचे कबूल केले.
advertisement
पोलिसांनी तात्काळ त्यांना अटक केली आणि चोरीचा सर्व मुद्देमाल हस्तगत केला. ही कारवाई शहापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली अविनाश मुंगसे, अरीफ वडगावे, रोहित डावाळे, सतीश कुंभार, अर्जुन फातले आणि ज्ञानेश्वरी राख यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.
advertisement
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
Kolhapur Crime: दोघांना करायचं होतं लग्न, पण पैसे कुठून आणणार? मग 'या' जोडप्याने रचला प्लॅन अन् केला मोठा कांड!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement