शहरात शिक्षण, नोकरी किंवा व्यवसायानिमित्त स्थायिक झालेले आणि दिवाळी सण साजरा करण्यासाठी गावी जाण्याची इच्छा असलेले नागरिक मोठ्या प्रमाणात एसटी सेवांचा लाभ घेणार आहेत. विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच पश्चिम महाराष्ट्रातील भागांमध्ये जाणाऱ्या या बससेवेमुळे प्रवाशांना सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रवासाचा पर्याय उपलब्ध झाला आहे.
advertisement
या जादा बससेवांसाठी आगारांमध्ये योग्य पार्किंग, तिकीट आरक्षण, तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे. तिकीट दरात सवलत योजनेअंतर्गत काही सवलतीदेखील देण्यात आल्या आहेत. 4 वर्षांखालील मुलांना मोफत प्रवास, 12 वर्षांखालील मुलांना अर्धे तिकीट, 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना अर्धे तिकीट आणि 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना पूर्ण मोफत प्रवास देण्यात आला आहे. तसेच महिला प्रवाशांसाठीही अर्धे तिकीट लागू आहे.
असे करा बस आरक्षण
आरक्षणासाठी एसटी महामंडळाने प्रवाशांना www.msrtc.gov.in आणि www.msrtcors.co.in या संकेतस्थळांवर ऑनलाइन बुकिंगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याशिवाय सर्व प्रमुख आगारांवर आणि अधिकृत आरक्षण केंद्रांवरही प्रवाशांना तिकीट मिळणार आहे.