हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश
अथर्व सुदामे हा एक गुणी क्रिएटर आहे. त्याने बनवलेल्या गणपती बाप्पाच्या रीलमध्ये काहीएक आक्षेपार्ह नाही, उलट हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश या रीलमधून दिला जात असेल तर हिंदू धर्म-संस्कृतीला ते साजेसंच आहे. परंतु सामाजिक एकोप्याला विरोध असलेल्या मनुवादी प्रवृत्तीने ट्रोल केल्याने त्याला हे रील डिलीट करण्याची वेळ आली, असं रोहित पवार म्हणाले.
advertisement
रीलमध्ये चुकीचं काय? - रोहित पवार
अथर्व सुदामेच्या या रीलमध्ये चुकीचं काय आहे? हे मुख्यमंत्री आणि दोन्हीही उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगावं अन्यथा ट्रोल करणाऱ्यांच्या मुसक्या आवळाव्यात. अथर्व सुदामे यानेही ट्रोलरला न घाबरता बेडरपणे पुढं यायला हवं, कारण मराठी माणूस हा घाबरणारा नाही तर लढणारा असतो, असं रोहित पवार म्हणाले आहेत. आपल्या सर्वच संतांनी दिलेली बंधुता आणि सामाजिक एकात्मतेची शिकवण अथर्व सुदामे याच्या या रिलमधून बघायला मिळते. मला अत्यंत आवडलेलं हे रिल मी शेअर करतोय, असं म्हण त्यांनी सोशल मीडियावर रील शेअर केली आहे.
दरम्यान, गणपतीच्या मूर्तीवर त्याने बनवलेल्या एका रील्समुळे हिंदुत्ववादी संघटनांकडून त्याच्यावर टीकेची झोड उठली आहे. त्याला शिव्या आणि धमक्याही मिळत आहेत. या वादामुळे ब्राह्मण महासंघानेही अथर्ववर टीका केली आहे. ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी आनंद दवे यांनी अथर्वला थेट सल्ला दिला आहे. ते म्हणाले, “अथर्व सुदामे तू फक्त करमणूक कर, लोकांना हसव आणि तुझं पोट भर! यापेक्षा वेगळ्या काही अभ्यास नसलेल्या गोष्टीत पडू नकोस.”
