मुंबई : राज्यातील अनेक शहरांमध्ये मागील काही दिवस ढगाळ हवामान पाहायला मिळालं. आता राज्यावरील ढगाळ हवामानाचा सावट निवळण्यास सुरुवात झाली असून सर्वच प्रमुख शहरांमध्ये मुख्यतः निरभ्र आकाश पाहायला मिळणार आहे. परंतु कडाक्याच्या थंडीमध्ये ही घट पाहायला मिळत असून किमान तापमानामध्ये 4 ते 5 अंशांनी वाढ झालेली असल्याने राज्यामध्ये थंडीची तीव्रता कमी असल्याचे पाहायला मिळतंय. पाहुयात 18 जानेवारी रोजी राज्यातील प्रमुख शहरांमध्ये हवामानाची स्थिती कशी असेल.
advertisement
संपूर्ण राज्यभरात 18 जानेवारी रोजी स्वच्छ सूर्यप्रकाश आणि कोरड हवामान पाहायला मिळेल. मुंबई शहर आणि उपनगरात सामान्यतः निरभ्र आकाश राहील तर कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस एवढे राहील. पुणे शहरामध्ये मागील काही दिवस सकाळच्या वेळी दाट धुके पाहायला मिळाले. 18 जानेवारी जानेवारी रोजी पुण्यामध्ये निरभ्र आकाश राहून कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 16 अंश सेल्सिअस एवढे राहील.
कंगनाचा इमर्जन्सी सिनेमा पाहून मुंबईकर काय म्हणाले…Video
मराठवाड्यामध्येही पुढील काही दिवस निरभ्र आकाश पाहायला मिळेल तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 29 अंश सेल्सिअस एवढे कमाल तर 16 अंश सेल्सिअस एवढे किमान तापमान असेल. राज्यात सर्वाधिक थंडी पडत असलेल्या नाशिक जिल्ह्यामधूनही गारठा कमी झाला आहे. नाशिकमध्ये 32 अंश सेल्सिअस एवढे कमाल तापमान तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस एवढे राहील. नाशिकमधील आकाश सामान्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे.
उपराजधानी नागपूरमध्ये मात्र धूक्यासह ढगाळ आकाश राहण्याची शक्यता आहे. तर नागपूरमधील कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 16 अंश सेल्सिअस एवढे राहील. एक वेळ 9 ते 10 अंश सेल्सिअस पर्यंत खाली घसरलेला किमान तापमानाचा पारा आता 15 ते 16 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. यामुळे राज्यातून थंडीची तीव्रता कमी झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. पुढील काही दिवस राज्यांमध्ये असंच वातावरण राहण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.





