Navale Bridge Accident : नवले पुलावरचा मृत्यूचा कंटेनर, पहिला भयानक VIDEO, हे दृष्य मन विचलित करतील

Last Updated:

पुण्याच्या नवले ब्रिजवरील भीषण अपघाताचा आता पहिला व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून काळजाचा ठोका चुकतो आहे.

Pune Navale Bridge Accident : पुणे बंगळुरु महामार्गावर नवले ब्रिजनजीक आज भीषण अपघाताची घटना घडली होती. या अपघातात एका भरधाव कंटेनरचा ब्रेकफेल झाला होता.त्यामुळे त्याने एका कंटेनर आणि कारला भीषण धडक दिली होती. या धडकेनंतर स्फोट होऊन आग लागली होती. या आगीत होरपळून आता आठ जणांचा मृत्यू झाला होता.ज्यामध्ये चार पुरूष ,तीन महिला आणि सात वर्षांची मुलगी अशा आठ जणांचा समावेश होता.तसेच या अपघातात 20 जण गंभीररित्या जखमी झाली होती. या भीषण अपघाताचा आता पहिला व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून काळजाचा ठोका चुकतो आहे.
पुण्यातील या अपघाताचा आता व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्या अंगावर शहारे येतील.कारण भरधाव वेगात एक कंटेनर येतो आहे. या दोन्ही कंटेनरच्यामध्ये कार अडकली आहे. आणि या गाड्यांनी पेट घेतला आहे. विशेष म्हणजे ज्यावेळेस ही आग लागली होती त्यावेळेसही या गाड्या पळत होत्या. त्यामुळे हा अपघात पाहून अंगावर काटा येतो आहे.
advertisement
पुणे बंगळुरू महामार्गावर राजस्थान पासिंगचा लोडेड ट्रक साताऱ्यावरुन मुंबईच्या दिशेने जात होता.पण नवले ब्रीजजवळ येताच ट्रकचा ब्रेकफेल झाला होता.त्यामुळे ब्रेक फेल झाल्यामुळे तो अनेक मीटर पर्यंत वाहनांना धडक देत पुढे जात होता. याच दरम्यान या कंटेनरच्या समोर एक कंटेनर आला होता व दोघांमध्ये एक कार देखील होती.यावेळी भरधाव कंटेनरसह कार आणि दुसऱ्या कंटेनरला धडक दिली होती.ही धडक इतकी भीषण होती कार थेट दुसऱ्या कंटेनरच्या मागच्या टायरमध्ये घुसली होती.या दरम्यान कारचा स्फोट देखील झाला होता त्यामुळे तीनही वाहनांना आगीच्या भक्ष्यस्थानी आल्या होत्या.
advertisement
या भीषण अपघातातानंतर तत्काळ अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवलं होतं. या अपघातात एक कंटेनर चालक आणि त्याचा हेल्पर तसेच कारमधील पाच जण अशा साधारण आठ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात नेण्यात आला आहे. सध्या मृतदेहाचे डीएनए घेण्याचे काम सुरू आहे .ड्रायव्हरच्या पोटात काही दारूचा वैगेरे अंश मिळतोय का याची देखील तपासणी होणार आहे. मृतदेहाचा पूर्ण कोळसा झाल्याने ओळख पटवण्यात मोठ्या अडचणी येत असून गाडीच्या नंबर वरून तपास सुरू आहे.
advertisement
दरम्यान या घटनेनंतर कात्रजकडून आणि साताऱ्याकडून मुंबईच्या दिशेने जात आहेत ,त्यांनी कुणीही तासभर तरी या महामार्गावर येण्याचा प्रयत्न करू नये,असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Navale Bridge Accident : नवले पुलावरचा मृत्यूचा कंटेनर, पहिला भयानक VIDEO, हे दृष्य मन विचलित करतील
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement