मुंबई : राज्यात गेले काही दिवस थंडीचा जोर कायम आहे. तुरळक ठिकाणी किमान तापमानात घट होऊन शीत लहरींचा इशारा देखील हवामान विभागाकडून देण्यात आला होता. हिवाळ्याच्या सुरुवातीपासूनच नाशिकमध्ये किमान तापमानात घट बघायला मिळत आहे. आता सुद्धा नाशिकमध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद आहे. नाशिक, पुणे, विदर्भ, मराठवाडा या सर्व भागांत थंडीचा जोर गेल्याकाही दिवसांपासून कायम आहे. पाहुयात पुढील 24 तासांमध्ये राज्यातील हवामानाची स्थिती कशी असेल.
advertisement
17 डिसेंबर रोज मंगळवारला राज्यात हवामान कोरडे असणार असून तुरळक ठिकाणी धुक्यासह ढगाळ आकाश असणार आहे. कुठलीही पावसाची शक्यता नाही. मात्र थंडीचा जोर कायम असणार आहे. मुंबई शहर आणि उपनगरात पुढील 24 तासांत सकाळी धुके आणि नंतर मुख्यतः निरभ्र आकाश असून मुंबईतील कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस इतके असणार आहे.
केसातील कोंडा घालवण्यासाठी घरगुती उपाय करत आहात? तर थांबा, पाहा डॉक्टर काय सांगतात
पुण्यामध्ये 17 डिसेंबरला धुक्यासह ढगाळ आकाश असून कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 10 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. पुण्यातील किमान तापमानात पुन्हा घट झालेली दिसून येत आहे. पुण्यात पुढील काही दिवस थंडीचा जोर कायम असणार आहे.
छत्रपती संभाजी नगरमध्ये 17 डिसेंबरला सकाळी धुके आणि नंतर मुख्यतः निरभ्र आकाश राहणार असून तेथील कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 11 अंश सेल्सिअस इतके असणार आहे. छत्रपती संभाजीनगर मधील किमान तापमानात देखील घट झालेली बघायला मिळत आहे.
विदर्भातील नागपूरमध्ये 17 डिसेंबरला धुक्यासह ढगाळ आकाश असून तेथील कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 11 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. विदर्भात गेले काही दिवस थंडीचा जोर कायम असल्याचे पाहायला मिळत आहे.
17 डिसेंबरला उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख शहर असलेल्या नाशिकमध्ये मुख्यतः निरभ्र आकाश असून तेथील कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 10 अंश सेल्सिअस इतकं असण्याची शक्यता आहे. नाशिकमधील थंडीचा जोर अजूनही कायम आहे. पुढील काही दिवस नाशिकमधील किमान तापमान स्थिर असण्याची शक्यता आहे.
राज्यात गेले काही दिवस थंडीचा जोर कायम आहे. पुढील काही दिवस सुद्धा राज्यात थंडीचा जोर असाच कायम असणार आहे. राज्यातील सर्वच ठिकाणी आता किमान तापमानात घट नोंदवल्या गेली आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.





