विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर नागपूर, अमरावती, वाशिम, गडचिरोली आणि मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
मुंबई शहर आणि उपनगरामध्ये 21 मार्च रोजी सकाळच्या वेळी धुकं पडण्याची शक्यता असून त्यानंतर आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तर मुंबईतील कमाल तापमान तेही 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस एवढे असणार आहे.
advertisement
Sparrow Day: एक पाण्याचं भांडं चिमण्यांसाठी, कोल्हापूरच्या महाविद्यालयाचा अनोखा उपक्रम
पुणे शहरामध्ये कमालीची उष्णता असल्याचं पाहायला मिळत आहे. पुण्यामध्ये कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस एवढे राहण्याची शक्यता आहे. तर पुण्यामध्ये सायंकाळनंतर ढगाळ आकाश राहण्याची देखील शक्यता आहे. कोल्हापूरमध्ये सकाळच्या वेळी दाट धुके पाहायला मिळणार असून त्यानंतर आकाश निरभ्र होईल. तर कोल्हापूरमध्ये कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस एवढे असणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये आकाश निरभ्र राहणार असून कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस एवढे असणार आहे.
उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख शहर असलेल्या नाशिकमध्ये ढगाळ आकाश राहण्याची शक्यता असून कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअस एवढे असणार आहे. राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता असून कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस एवढे असणार आहे.





