मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आल्हाददायक वातावरण राहणार असून ढगाळ आकाशासह कमाल तापमान हे 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस एवढे राहण्याची शक्यता आहे. पुणे शहरामध्ये उष्णतेचे चटके चांगलेच बसायला सुरुवात झाली आहे. पुण्यामध्ये पुढील 24 तासांमध्ये कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस एवढे असणार आहे. तर कोल्हापूरमध्ये हलक्या पावसाची देखील शक्यता आहे. कोल्हापूरमधील कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस एवढे असेल.
advertisement
तर मराठवाड्यामध्ये सकाळच्या वेळी काहीसे धुके राहण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये कमाल तापमान 39 अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता असून किमान तापमान 22 अंश सेल्सिअस एवढे असेल. उत्तर महाराष्ट्रातही सकाळच्या वेळी धुके राहण्याची शक्यता असून नाशिकमध्ये कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस एवढे असेल तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस एवढे असेल. नागपूरमध्ये आज हिटवेव असल्याचं पाहायला मिळालं तर 15 मार्चला देखील नागपूरमध्ये कमाल तापमान 41 अंश सेल्सिअसपर्यंत असणार असून उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.





