महिन्याची मुदतवाढ
पुण्यात घर घेण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. म्हाडाच्या घरांमुळे गोरगरिबांनाही हे स्वप्न साकार करण्याची संधी मिळते. म्हाडातर्फे 6 हजार 294 सदनिकांसाठी सोडत जाहीर करण्यात आली आहे. यासाठी यापूर्वी 12 नोव्हेंबर अशी अंतिम तारीख देण्यात आली होती. मात्र या काळात दिवाळी सण तसेच विधानसभा निवडणुकीमुळे अनेकांना अर्ज करता आले नाही. परिणामी अर्ज करण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती साकोरे यांनी यावेळी दिली.
advertisement
अर्ज करण्याची अंतिम तारीख
म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्याची मुदत आता 10 डिसेंबर असेल. 10 डिसेंबर रोजी पाच वाजेपर्यंतची ऑनलाईन अर्ज करता येईल. अर्ज सादर करण्यासाठी रात्री बारा वाजेपर्यंत तर ऑनलाइन पेमेंट स्वीकृतीसाठी 12 डिसेंबर रोजी रात्री बारा वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. बँकेत आरटीजीएस, एनईएफटीद्वारे अनामत रक्कम भरण्यासाठी 13 डिसेंबर अशी मुदत देण्यात आली असून 7 जानेवारी 2025 रोजी सोडत काढण्यात येणार असल्याची माहिती साकोरे यांनी दिली.
दरम्यान, पुण्यात घर घेण्यासाठी इच्छुकांना आणखी एक संधी मिळाली असून त्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह लवकरात लवकर अर्ज करावा लागणार आहे.