ठेकेदार आणि महापालिकेचा गोंधळ
या प्रकल्पासाठी महापालिकेने नवीन टेंडर काढलेले नाहीत. आधीच्या वाहनांना विमाननगरमध्ये आणून कामासाठी वापरले जात आहे. कचरा वेचकांना रस्ते झाडणीचे काम ठेकेदाराद्वारे दिले आहे, पण कामावर लक्ष ठेवणे महापालिकेचे मुकादम आणि आरोग्य निरीक्षक करत आहेत, असे कामगारांकडून सांगण्यात येत आहे.
advertisement
कामगारांचे आरोप नेमके काय आहेत ?
कचरा वेचक कामगारांनी सांगितले की, 2 महिने झाले तरी सर्व कामगारांना कामावर घेतलेले नाही. ड्रायव्हर पदासाठी 9 जणांनी अर्ज केले होते, पण फक्त 5 जणांना कामावर ठेवण्यात आले आहे. तसेच, पगार वेळेवर मिळत नसल्याचीही तक्रार त्यांनी केली आहे. कामाची नीट व्यवस्था नसल्यामुळे कामगारांना मानसिक ताण जाणवत आहे आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे त्यांनी महापालिकेकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.






