TRENDING:

वाह रं पठ्ठ्या...छत्रपती शिवरायांचा मावळाच तू; वय अवघं साडेचार वर्ष अन् सर केले 103 किल्ले!

Last Updated:

आता तो 100हून अधिक किल्ले सर करणारा आशियातला सर्वात तरुण व्यक्ती ठरलाय. 'सर्वात लहान दुर्गवीर' अशी ओळख त्याला मिळाली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्राची केदारी,  प्रतिनिधी
advertisement

पुणे : छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात जन्म झाला, जगायला आणि काय कारण हवं...या पावन भूमीत जन्म घेऊन आपलं पूर्ण जगणंच सार्थक झालंय. हीच बाब लक्षात घेऊन अनेक आई-वडील आपल्या मुलांना लहानपणापासूनच शिवरायांच्या सुवर्ण इतिहासाचं बाळकडू देतात. समुद्रकिनारी निवांत बसून सुर्योदय आणि सूर्यास्त पाहण्याच्या या काळात अनेक पालक आपल्या पाल्यांना पराक्रमांनी आजही धगधगणाऱ्या त्या गड, किल्ल्यांच्या भिंतींचा सहवास देतात. तेही आजच्या अशा परिस्थितीत ज्यात मुलांच्या हातातून मोबाईल काढून घेणं म्हणजे आई-वडिलांसाठी मोठा टास्क असतो. त्यामुळे साडेचार वर्षांच्या आयांशचं तर खरोखर कौतुक आहे.

advertisement

या चिमुकल्यानं 1 नाही 2 नाही, तर महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील तब्बल 103 किल्ले सर किल्ल्यांची भ्रमंती केली आहे. शिवाय आता तो 100हून अधिक किल्ले सर करणारा आशियातला सर्वात तरुण व्यक्ती ठरलाय. 'सर्वात लहान दुर्गवीर' अशी ओळख त्याला मिळाली आहे. मूर्ती लहान आणि कीर्ती महान म्हणतात ते हेच. त्याच्या या विक्रमाची नोंद आता थेट 'एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये झाली आहे.

advertisement

'या' गोल्डन बेटाला भेट द्याल, तर लक्षद्वीप आणि मालदीव विसराल...एवढं भारी सौंदर्य! PHOTOS

View More

4 वर्ष 8 महिने वय असलेल्या या पठ्ठ्याचं पूर्ण नाव आहे आयांश पराग ढवळे. त्याने आजवर 38 गिरिदुर्ग, 43 जलदुर्ग आणि 22 भुईकोट गडांची भ्रमंती केली. तो सांगतो, शिवनेरी किल्ला चढताना तोफा आणि पाणी दिसतं. तो त्याच्या आजी-आजोबा आणि आई-वडिलांसोबत ट्रेकींग करतो. 'असे आणखी अनेक गड-किल्ले सर करायचे आहेत, एव्हरेस्टदेखील सर करायचंय', असं आयांश म्हणाला.

advertisement

शेकडो वर्षे बंद होता बोगदा; घाबरत घाबरतच आत घुसली व्यक्ती, बाहेर येताच पालटलं नशीब

आयांशच्या कुटुंबियांचे तब्बल 14 जिल्ह्यांतील गड, किल्ले बघून झाले आहेत. ते म्हणतात, जेव्हा कधी आम्हाला सुट्टी मिळते तेव्हा आम्ही सर्वजण ट्रेकिंगला जातो. आयांशच्या आजी-आजोबांना ट्रेकिंग फार आवडते, त्यामुळे मुलांमध्येदेखील ती आवड निर्माण झाली आहे. मुलांसोबत आम्हीसुद्धा ही आवड जोपासतोय, असं ते सांगतात. विशेष म्हणजे किल्ल्यावर गेल्यानंतर आयांश आणि त्याचा भाऊ हिमांग याला कुटुंबीय त्या विशिष्ट किल्ल्याबाबत माहिती सांगतात.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
वाह रं पठ्ठ्या...छत्रपती शिवरायांचा मावळाच तू; वय अवघं साडेचार वर्ष अन् सर केले 103 किल्ले!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल