शिवभक्तांसाठी श्रावणी सोमवारचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. पहिला श्रावणी सोमवार 28 जुलैला आणि दुसरा 4 ऑगस्टला तर तिसरा 11 ऑगस्टला तसेच चौथा सोमवार हा 18 ऑगस्टला आलेला आहे. श्रावण महिन्यातील सोमवारी महादेवाला वाहिली जाणारी शिवमूठ शंकर उपासनेत अत्यंत महत्त्वाची मानली जाते. याच श्रावणातील पहिला सण नागपंचमी हा 29 जुलैला आलेला आहे.
advertisement
अखंड सौभाग्य आणि धन-धान्य-समृद्धी यासाठी विवाहित स्त्रिया श्रावण सोमवारी महादेवाला शिवमूठ वाहतात. विवाहानंतर पहिली पाच वर्षे हे व्रत केले जाते. प्रत्येक सोमवारी एकभुक्त राहून महादेवाला बेलाची पाने, तांदूळ, सुपारी, गंध, फूल वाहून पूजा करावी, असं डॉ. नरेंद्र धरणे सांगतात.
येत्या चार सोमवारी अशा प्रकारे महादेवाला अर्पण करावी शिवमूठ. पहिला सोमवार 28 जुलैला आहे या दिवशी तांदळाची शिवमूठ ही देवाला वाहावी. 4 ऑगस्ट दुसरा सोमवार या दिवशी तिळाची शिवमूठ महादेवाला अर्पण करावी. 11 ऑगस्ट तिसरा सोमवार या दिवशी मूग डाळीला महत्त्व देऊन देवाला अर्पण करावी. चौथा सोमवार हा 18 ऑगस्टला येत आहे या दिवशी जव मूठ अर्पण करावी.
यंदा अंगारकीचे महत्त्व यासाठी
संकष्टी चतुर्थी जेव्हा मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी चतुर्थी म्हणून संबोधले जाते. यामागची कथा ब्रह्मांडातील नवग्रहांपैकी मंगळ या ग्रहाशी निगडित आहे. 12 ऑगस्टला अंगारकी चतुर्थी असून 21 वर्षांनंतर हा योग येत आहे. बेल वाहून श्रावणी सोमवारचा उपवास सोडावा सुख प्राप्ती होईल, असंही डॉ. नरेंद्र धरणे यांनी सांगितलं.