TRENDING:

Asia cup 2025: जालन्याच्या लेकीचा सिंगापुरात डंका, आशिया कपमध्ये सुवर्णवेध, कसं मिळालं यश?

Last Updated:

Asia Cup 2025: जालन्याच्या लेकीने आशिया कप तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णवेध घेतलाय. तेजल साळवे हिला आता ऑलिम्पिक मेडल जिंकायचं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जालना: सिंगापूर येथे नुकत्याच संपन्न झालेल्या आशिया कप स्टेज टू स्पर्धेत जालन्याच्या लेकीने सुवर्ण कामगिरी केलीये. तेजल राजेंद्र साळवे हिने भारतासाठी तिरंदाजीमध्ये सुवर्णपदक पटकावले. तर सांघिक प्रकारातही रौप्य पदकावर नाव कोरलं आहे. जालना शहरात परतल्यानंतर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तेजलच्या या यशाबद्दल लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
advertisement

जालना शहरात राहणारी तेजल ही सर्वसामान्य घरातील मुलगी आहे. वडील एका खासगी दवाखान्यात लॅब असिस्टंट म्हणून काम करतात. तर आई गृहिणी म्हणून काम करते. तेजल 12 वर्षांची असतानाच तिच्यामधील गुण वडिलांनी हेरले आणि तिला योग्य तो मार्ग दाखवला. त्यामुळे जालन्यातील प्रशिक्षकांच्या मदतीने वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभागी होऊन ती आपली छाप पडू लागली.

advertisement

तुमची मुलं खेळता खेळता करतील 5 सोपी योगासनं, शरीरात होतील चांगले बदल

2024 मध्ये मोठी संधी

View More

2024 मध्ये तेजलला पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. यानंतर तिने मागे वळून पाहिलंच नाही. सिंगापूर येथे नुकत्याच संपन्न झालेल्या आशिया कप स्टेज टू स्पर्धेमध्ये तिने सांघिक प्रकारात रौप्य पदक, तर वैयक्तिक प्रकारात सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं आहे. तर 2025 मध्येच होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक पटकवण्याचे तिचे ध्येय आहे.

advertisement

ऑलिम्पिक मेडल जिंकायचंय

“आशिया कप स्पर्धेत स्वतःसाठी भारताचे राष्ट्रगीत ऐकणं हा एक अभिमानाचा क्षण होता. हाच क्षण मला लॉस एंजेलिस येथील ऑलिंपिक स्पर्धेमध्ये पाहायचा आहे. गोल्ड मेडलिस्ट तेजल राजेंद्र साळवे असं नाव संपूर्ण जगाने ऐकावं,” अशी माझी इच्छा आहे आणि त्यासाठी मी प्रयत्न करत असल्याचे तेजलने लोकल18 सोबत बोलताना सांगितले.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Asia cup 2025: जालन्याच्या लेकीचा सिंगापुरात डंका, आशिया कपमध्ये सुवर्णवेध, कसं मिळालं यश?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल