पुणे: IPL मधील सर्वाधिक यशस्वी संघ म्हणून गतविजेता चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघाला ओळखलं जातं. आतापर्यंत या संघाची धुरा भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी सांभाळत होता. पण आता मराठमोळा फलंदाज ऋतुराज गायकवाड सीएसके संघाचा कर्णधार असणार आहे. याबाबत घोषणा होताच त्याच्या चाहत्यांनी जल्लोष केला. ऋतुराज मुळचा पुणेकर असल्याने पुणेकरांनीही त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केलाय.
advertisement
पुणेकरांचा लाडका क्रिकेटर
पुण्यातील पिंपळे सौदागर भागात ऋतुराज गायकवाड हा वास्तव्यास होता. ऋतुराजची क्रिकेटमधील कामगिरी पाहता पुणेकरांचा लाडका क्रिकेटर म्हणून ऋतुराजकडे पाहिलं जायचं. ऋतुराज गायकवाड याची चेन्नई सुपर किंग्सच्या कॅप्टन पदी निवड झाल्याने पुणेकरांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. सतत विजयी होणारा संघ म्हणून सीएसके म्हणजे चेन्नई सुपर किंग्ज संघाकडे पाहिले जाते. ऋतुराजची मागील कामगिरी पाहता तो चेन्नई संघाचे नेतृत्व चांगल्या पद्धतीने करेल, असा विश्वास पुणेकर क्रिकेट प्रेमींनी व्यक्त केलाय.
IPL 2024 : धोनीने का सोडलं कर्णधारपद? जडेजाला वगळून ऋतुराज गायकवाडलाच का दिली संधी?
धोनी करेल मार्गदर्शन
चेन्नई संघाला कर्णधार म्हणून महेंद्रसिंह धोनीची कमी जाणवेल. परंतु धोनी ऋतुराजला योग्य मार्गदर्शन करेल असा विश्वास देखील पुणेकर क्रिकेट प्रेमींनी व्यक्त केलाय. एकंदरीतच ऋतुराजच्या निवडीने पुणेकरांमध्ये उत्साहाचं वातावरण दिसून येत आहे. त्यामुळे आयपीएल 2024 ची पुणेकर आतुरतेने वाट पाहत आहेत.
मराठमोळा ऋतूराज सांभाळणार CSK; 'या' मैदानावर तिकीट दर 500 रुपये
ऋतुराजचा खेळातील सातत्य
क्रिकेटच्या मैदानावरील ऋतुराजची कामगिरी सातत्यपूर्ण राहिली आहे. त्यामुळं चेन्नई संघातील तो एक भरवशाचा व प्रमुख खेळाडू बनला आहे. आयपीएलमधील त्याच्या कामगिरीमुळं भारताच्या एकदिवसीय संघातही त्याला स्थान मिळालं आहे. त्यानं आतापर्यंत 6 वनडे आणि 19 टी-20 सामने खेळले आहेत. आयपीएलमधील 52 सामन्यांत 39.06 च्या सरासरीनं आणि 135.52 च्या स्ट्राइक रेटनं त्यानं 1797 धावा केल्या आहेत.