मराठमोळा ऋतूराज सांभाळणार CSK; 'या' मैदानावर तिकीट दर 500 रुपये
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
चेन्नई सुपर किंग्सच्या कर्णधारपदावरून पायउतार होत महेंद्रसिंग धोनीने आज ऋतूराज गायकवाडला कर्णधारपद दिल्याने फॅन्समध्ये नाराजीचं वातावरण आहे.
अंकित राजपूत, प्रतिनिधी
जयपूर : उद्यापासून IPL 2024ला सुरूवात होतेय. त्यामुळे क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. चेन्नई सुपर किंग्सच्या कर्णधारपदावरून पायउतार होत महेंद्रसिंग धोनीने आज ऋतूराज गायकवाडला कर्णधारपद दिल्याने फॅन्समध्ये नाराजीचं वातावरण आहे, पण आता ऋतूराज गायकवाड ही जबाबदारी कशी सांभाळतो हे पाहणंही औत्सुक्याचं ठरेल.
दरम्यान, ज्या मैदानांवर आयपीएल सामने पार पडणार आहेत तिथं तिकीट खरेदीसाठी क्रिकेटप्रेमींमध्ये झुंबड पाहायला मिळते. राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूरमध्ये आयपीएलचे तीन सामने खेळवले जाणार आहे. हे सामने पाहण्यासाठी प्रशासनाने विद्यार्थ्यांना खास सवलत दिली आहे.
advertisement
हेही वाचा : IPL 2024 : उद्यापासून IPL चा रणसंग्राम, चेन्नई - बंगळुरूमध्ये पहिला सामना, कसा आहे दोन्ही संघांचा मॅच रेकॉर्ड?
दरवर्षी क्रिकेटप्रेमी आयपीएलची आतुरतेने वाट पाहत असतात. आता आयपीएल 2024चा पहिला सामना 22 मार्चला खेळवला जाईल. जयपूरमध्ये आयपीएलचे तीन सामने पार पडतील. इथल्या सवाई मानसिंह स्टेडियमवर होणारे सामने पाहायचे असतील, तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे. इथल्या प्रशासनाने तिकीट दरात मोठी कपात केली असून विद्यार्थ्यांना हे सामने केवळ 500 रुपयांमध्ये पाहता येणार आहेत. सवाई मानसिंह स्टेडियमच्या तीनही एंट्री गेटवर असलेल्या काउंटर्सवर विद्यार्थी आपला आयडी कार्ट दाखवून तिकीट खरेदी करू शकतात.
advertisement
तिकीट दर कमी करण्याचे आदेश बुधवारी देण्यात आले. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा चार अतिरिक्त श्रेणींमध्ये तिकीटविक्री सुरू आहे. वाद विवादांमुळे यंदा प्रेसिडंट बॉक्सची व्यवस्था बंद करण्यात आली आहे.
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो…या लिंकवर क्लिक करा
Location :
Jaipur,Rajasthan
First Published :
March 21, 2024 8:35 PM IST