2019 मध्ये जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांच्या सहकार्याने क्रीडा प्रबोधिनीची सुरुवात झाली. ग्रामीण भागातील तळागाळातील विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा हा या प्रबोधिनीचा उद्देश आहे. जिल्हा परिषद शाळेतील पाच हजार शिक्षकांनी प्रत्येकी एक हजार रुपये जमा करून तब्बल एक कोटी 63 लाख रुपये जमा केले. यातून या विद्यार्थ्यांसाठी खेळाचे साहित्य, निवासाची आणि भोजनाची व्यवस्था केली जाते. सध्या तब्बल 100 विद्यार्थी वेगवेगळ्या खेळांचे प्रशिक्षण क्रीडा प्रबोधिनी मध्ये घेत आहेत.
advertisement
दिवसाला 40 अंडी अन् किलोभर चिकनचा खुराक, पोलीस कॉन्सटेबलचा अमेरिकेत धमाका!
कोल्हापुरातील प्रबोधिनीचा आदर्श
क्रीडा प्रबोधिनी सुरू करण्यामागे कोल्हापूर जिल्ह्यामधील क्रीडा प्रबोधिनी आहे. त्याच्या प्रमाणे आम्ही ही क्रीडा प्रबोधिनी सुरू केली. यासाठी जिल्हा परिषदच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोडा आणि माजी उपशिक्षणाधिकारी नागेश मापारी यांचे फार योगदान आहे. जेव्हा ही क्रीडा सुरू केली तेव्हा आमच्याकडे कुठल्याही प्रकारच्या सुविधा नव्हत्या. बसायला खुर्च्या नव्हत्या मांडी घालून आम्ही ऍडमिशन प्रक्रिया सुरू केली. आमच्याकडे वसतीगृह नव्हतं. केजीबीचं वसतीगृह बंद पडलं होतं. त्या वसतिगृहात आम्ही मुलामुलींची व्यवस्था केली. मुलांसाठी शाळेचे वर्ग खोल्या होत्या त्या ठिकाणी आम्ही हे सुरू केलं. या ठिकाणी मैदान सुद्धा नव्हतं, असं व्यवस्थापक प्रमोद खरात सांगतात.
100 मुलांना क्रीडा प्रशिक्षण
या ठिकाणी 50 मुलं आणि 50 मुली निवासी आहेत. त्यांना या ठिकाणी निवास व भोजन मोफत आहे. त्यांना आम्ही स्पोर्टचा युनिफॉर्म त्याच्यामध्ये ट्रॅक सूट, दोन टी-शर्ट, एक स्पोर्ट शूज दिले आहेत. या ठिकाणी मुलांना अतिशय चांगल्या दर्जाचं जेवण दिलं जातं. सकाळचा नाश्ता देखील अतिशय न्यूट्रिशियस असतो. इथे शिकणारी सर्व मुले जिल्हा परिषद शाळांतील आणि अतिशय तळागाळातून आलेली आहेत. या विद्यार्थ्यांमध्ये काहीतरी करून दाखवण्याची धमक आहे आणि म्हणूनच यांना प्रशिक्षित करून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय लेव्हल पर्यंत नेण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे, असं खरात यांनी सांगितलं.
परिस्थितीनं बनवलं भिकारी, पण जिद्दीनं बनला निराधारांचा आधार, काम पाहून कराल सलाम, Video
भविष्यात राष्ट्रीय खेळाडू व्हायचंय
माझी इथे निवड 2022 मध्ये झाली. मला वाटलं सुद्धा नव्हतं की माझी इथे निवड होईल. इथे सगळ्या प्रकारच्या सुविधा आम्हाला दिल्या जातात. जसे की जेवण, खेळासाठी लागणारे साहित्य तसेच मोफत कोचिंग दिली जाते. आता माझी निवड राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेसाठी झाली आहे. भविष्यात नॅशनल खेळण्याची माझी इच्छा आहे, असं वैष्णवी बळीराम सोनटक्के हिने सांगितलं