आयपीएल 2022 (IPL 2022) च्या मोसमाला 26 मार्चपासून सुरूवात होणार आहे, तर फायनल 29 मे रोजी होणार आहे. आयपीएलच्या यंदाच्या मोसमात 2 टीम वाढल्या आहेत, त्यामुळे टीमची संख्या 10 एवढी झाली आहे. कोरोना व्हायरस आणि बायो-बबलच्या नियमांमुळे प्रवास टाळण्यासाठी स्पर्धेच्या लीग स्टेजच्या सामन्यांचं आयोजन मुंबई-पुण्यात करण्यात आलं आहे. मुंबईतल्या वानखेडे, ब्रेबॉर्न, नवी मुंबईतल्या डी.वाय.पाटील आणि पुण्याच्या एमसीए स्टेडियमवर आयपीएल सामने होतील. मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) टीम आयपीएल इतिहासातली सगळ्यात यशस्वी टीम आहे. मुंबईने सर्वाधिक 5 वेळा आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. त्याखालोखाल चेन्नई सुपर किंग्सने (CSK) 4 वेळा आयपीएल स्पर्धा जिंकली.

आयपीएलच्या टीमची संख्या वाढल्यामुळे फेब्रुवारी महिन्यात मेगा ऑक्शन झाला, त्यामुळे या मोसमापासून बरेच खेळाडू आता दुसऱ्या टीमकडून खेळताना दिसणार आहेत.

या मोसमात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) असेल, तर चेन्नई सुपर किंग्सने एमएस धोनी (MS Dhoni), आरसीबीने (RCB) फाफ डुप्लेसिस, सनरायजर्स हैदराबाने (SRH) केन विलियमसन, राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) संजू सॅमसन, दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) ऋषभ पंत, पंजाब किंग्सने (Punjab Kings) मयंक अग्रवाल, कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) श्रेयस अय्यरला कॅप्टन्सीची जबाबदारी दिली आहे. आयपीएलच्या दोन नव्या टीम गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) हार्दिक पांड्या आणि लखनऊ सुपर जाएंट्सने (Lucknow Super Giants) केएल राहुलला कर्णधार केलं आहे.

अजून दाखवा …