वापराचं टायमिंग ठरवा
दिवसभर स्मार्टफोन वापरण्यासाठी एक निश्चित टाइम लिमिट सेट करा. उदाहरणार्थ, सोशल मीडियाचा वापर फक्त 30 मिनिटांपर्यंत मर्यादित करा. तुमच्या फोनवर स्क्रीन टाइम ट्रॅकिंग फीचर वापरा जेणेकरून तुम्ही किती वेळ वाया घालवत आहात हे तुम्हाला कळेल.
हे आहेत बजेट फ्रेंडली 5 ईयरबड्स, हजार रुपयांत मिळेल भारी साउंड
advertisement
Notification बंद करा
स्मार्टफोनवर वारंवार येणाऱ्या नोटिफिकेशन लक्ष विचलित करतात. अनावश्यक ॲप्सचे नोटिफिकेशन बंद करा. यामुळे तुमचे लक्ष पुन्हा पुन्हा फोनकडे जाणार नाही.
डिजिटल डिटॉक्स करा
दर आठवड्याला एक दिवस डिजिटल डिटॉक्स करा. या दिवशी फोन अजिबात वापरू नका. त्याऐवजी, एखादे पुस्तक वाचा, कुटुंबासोबत वेळ घालवा किंवा काही क्रएटिव्ह अॅक्टिव्हिटीमध्ये भाग घ्या.
डिस्ट्रॅक्शन टाळा
तुमचा फोन नेहमी तुमच्यापासून दूर ठेवा. विशेषतः जेव्हा तुम्ही अभ्यास करत असाल, काम करत असाल किंवा कुटुंबासोबत वेळ घालवत असाल. झोपताना फोन बेडपासून दूर ठेवा म्हणजे रात्री फोन तपासण्याची सवय संपेल.
डेली 2GB डेटासह मिळेल 12 OTT अॅप्सचं सब्सक्रिप्शन! Jio चा जबरदस्त प्लॅन
फक्त आवश्यक Apps ठेवा
तुमच्या स्मार्टफोनमध्ये फक्त तेच ॲप्स ठेवा जे तुमच्यासाठी उपयुक्त आहेत. निरुपयोगी गेम आणि सोशल मीडिया ॲप्स हटवा.
रियल-लाइफ कनेक्शनला महत्त्व द्या
मित्र आणि कुटुंबासह वास्तविक जीवनात वेळ घालवा. तुम्ही तुमच्या प्रियजनांशी जितके जास्त कनेक्ट व्हाल तितकी तुम्हाला तुमच्या फोनची गरज कमी वाटेल. फोनला ऑप्शनला शोधण्यासाठी, पेंटिंग, गार्डनिंग, योग किंवा संगीत यासारखे नवीन छंद जोडा. या उपक्रमांमुळे तुमचा वेळ तर भरेलच पण मानसिक शांतीही मिळेल. स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे केवळ वेळच वाया जात नाही तर तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होतो.