डेली 2GB डेटासह मिळेल 12 OTT अॅप्सचं सब्सक्रिप्शन! Jio चा जबरदस्त प्लॅन
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Reliance Jio Entertanment Plan: Jio आपल्या यूझर्सना विविध प्राइज रेंजमध्ये अनेक रिचार्ज प्लॅन ऑफर करते. जे विविध फायद्यांसह येतात. आज आम्ही तुम्हाला Jio च्या अशा प्लॅनविषयी सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला दररोज 2 GB डेटासह 12 OTT ॲप्सचे सबस्क्रिप्शन मिळेल.
Reliance Jio OTT Apps Plan: रिलायन्स जिओ ही देशातील एक प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी आहे. त्याचे मालक उद्योगपती आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी आहेत. जिओ देशभरात उत्तम कनेक्टिव्हिटी आणि इंटरनेटसाठी ओळखला जातो. कंपनी आपल्या यूझर्सना विविध किंमती रेंजमध्ये अनेक रिचार्ज प्लॅन ऑफर करते. जे विविध फायद्यांसह येतात. आज आम्ही तुम्हाला Jio च्या अशा प्लॅनविषयी सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला दररोज 2 GB डेटासह 12 OTT ॲप्सचे सबस्क्रिप्शन मिळेल. चला या प्लॅनविषयी सविस्तर जाणून घेऊया.
जिओची उत्तम एंटरटेनमेंट प्लॅन
जिओच्या पोर्टफोलिओमध्ये सर्व प्रकारचे प्लॅन उपलब्ध आहेत. जिओ आपल्या यूझर्सना अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा तसेच फ्री OTT ॲप्ससह प्लॅन ऑफर करते. तुम्हाला OTT ॲप्सवर ऑनलाइन कंटेंट पाहणे आवडत असल्यास, हे प्लॅन तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. आम्ही ज्या जिओ प्लॅनविषय़ी बोलत आहोत त्याची किंमत 448 रुपये आहे आणि हा प्लॅन तुम्हाला जिओच्या वेबसाइटवरील एंटरटेनमेंट प्लॅन सेक्शनमध्ये मिळेल.
advertisement
प्लॅनचे फायदे
फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, हा प्लॅन 28 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो आणि संपूर्ण व्हॅलिडिटी दरम्यान यूझर्सना अनलिमिटेड कॉलिंग सुविधा देते. म्हणजेच तुम्ही देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर तुम्हाला हवे तितके कॉल करू शकाल. यूझर्सना दररोज 100 टेक्स्ट मेसेज पाठवण्याची सुविधा देखील मिळते. या प्लॅनमध्ये यूजर्सना दररोज 2 GB डेटा मिळतो. अशा प्रकारे यूजर्सना एकूण 56 GB डेटा मिळतो.
advertisement
12 OTT ॲप्सची सदस्यता
view commentsतुमच्याकडे 5G स्मार्टफोन असेल आणि तुमच्या भागात 5G नेटवर्क उपलब्ध असेल, तर तुम्ही 5G इंटरनेट देखील वापरू शकता. याशिवाय यूझर्सना या प्लॅनमध्ये Sony LIV, ZEE5, JioCinema Premium, Lionsgate Play, Discovery+, Sun NXT, Kanchha Lanka, Planet Marathi, Chaupal, Hoichoi, FanCode, JioTV, JioCloud चे मोफत सबस्क्रिप्शन मिळते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 13, 2025 4:29 PM IST