हे आहेत बजेट फ्रेंडली 5 ईयरबड्स, हजार रुपयांत मिळेल भारी साउंड

Last Updated:

बजेट फ्रेंडली 5 शानदार इयरबड्सविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. यामधून एकाची किंमत 1 हजार रुपयांपेक्षाही कमी आहे.

ईअर बड्स
ईअर बड्स
Tech News: अनेक कंपन्यांचे इअरबड्स बाजारात उपलब्ध आहेत. ज्यामध्ये काहींची किंमत जास्त तर काहींची कमी आहे. आज आपण बजेट फ्रेंडली 5 इयरबड्सबद्दल जाणून घेऊया.
OnePlus Nord Buds 2
तुम्हाला क्वालिटीशी तडजोड करायला आवडत नसेल तर तुम्ही OnePlus वरून प्रीमियम इयरबड्स खरेदी करू शकता. Amazon वर त्यांची किंमत फक्त 1,599 रुपये आहे. OnePlus Nord Buds 2 12.4mm ड्रायव्हर्ससह येतो. तसेच, या बड्समध्ये क्वाड-मायक्रोफोन सेटअप देण्यात आला आहे. या बड्समध्ये क्लिअर कॉलिंगचा अनुभव उपलब्ध आहे. तसेच, इअरबडला IP55 रेटिंग आहे. या इअरबड्समध्ये 36 तासांपर्यंत बॅटरी लाइफ उपलब्ध आहे.
advertisement
Poco Pods
पोकोच्या या अप्रतिम पोड्स केवळ दिसायला स्टायलिश नाहीत तर त्यांची किंमतही खूप स्वस्त आहे. पोको पॉड्स फ्लिपकार्टवरून 1099 रुपयांना खरेदी करता येतील. Poco Pods 12mm ड्रायव्हर्ससह येतात. तसेच, त्यांची बॅटरी लाइफ 30 तास आहे. याशिवाय, कंपनी Poco Pods मध्ये ENC चे फीचर देखील प्रदान करते.
advertisement
TECSOX ALPHA
TECSOX ALPHA मध्ये 13 MM डायनॅमिक ड्रायव्हर्स आहेत, या बड्समध्ये चांगला बास आहे जो उत्कृष्ट साउंड क्वालिटी देतो. एकदा चार्ज केल्यानंतर, हे इअरबड 40 तासांपर्यंत प्लेबॅक टाइम देतात. हे तुम्ही Amazon वरून 1299 रुपयांना खरेदी करू शकता.
advertisement
boAt Airdopes 91 TWS Price
बोट Airdopes 91 तीन रंगांमध्ये उपलब्ध आहेत - एक्टिव्ह ब्लॅक, स्टाररी ब्लू आणि मिस्ट ग्रे. Amazon वर त्यांची किंमत 699 रुपये आहे. यामध्ये 50ms चा लो लेटेंसी मोड आहे. तसेच, हे बड्स 13mm ड्रायव्हर्ससह येतात.
Noise Buds N1 Pro TWS इयरबड्स
"Noise Buds N1 Pro" चार रंगात येतात - काळा, हिरवा, जांभळा आणि बेज (फिकट पिवळा), त्यांची सुरुवातीची किंमत फक्त 1498 रुपये आहे. हे बड्स अजमेनवरुन खरेदी केले जाऊ शकतात. N1 Pro मध्ये 11 मिमी ड्रायव्हर्स आहेत आणि त्यात कंपनीचे विशेष चार्जिंग तंत्रज्ञान 'InstaCharge' आहे, ज्यामुळे बॅटरी 60 तास टिकते.
view comments
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
हे आहेत बजेट फ्रेंडली 5 ईयरबड्स, हजार रुपयांत मिळेल भारी साउंड
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement