तुमची रील व्हायरल झाल्यावर तुम्हाला किती पैसे मिळतात?
इंस्टाग्राम रील्स व्हायरल झाल्यानंतर कंपनी पैसे देत नाही. तुमच्याकडे 1 मिलियन व्ह्यूज आहेत की 10 मिलियन आहेत याची कंपनीला पर्वा नाही. यासाठी तुम्हाला कमाई करावी लागेल. रीलला मोनेटाइज करण्यासाठी, काही अटी आहेत ज्या तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील. तुमच्या रील्सना चांगले व्ह्यूज मिळाले आणि तुम्ही ओरिजिनल कंटेंट शेअर केला, तर तुम्ही पेजला मोनेटाइज करुन पैसा कमावू शकतात.
advertisement
WhatsApp चॅटही होऊ शकते लीक? मार्क झुकरबर्गने वाढवलं यूझर्सचं टेन्शन
तुम्ही छोट्या क्रिएटरच्या अकाउंटला प्रमोट करु शकता
तुमच्या रीलला चांगले व्ह्यूज मिळाले आणि फॉलोअर्सची संख्याही जास्त असेल, तर तुम्ही छोट्या क्रेएटर्सच्या उकाउंटलाही प्रमोट करू शकता आणि पेमेंट घेऊ शकता.
इन्स्टाग्रामवर करा बिझनेस
तुम्ही इन्स्टाग्रामवर तुमची स्वतःची प्रोडक्ट देखील विकू शकता. यासाठी तुम्हाला नियमितपणे व्हिडिओ बनवावे लागतील. तुम्ही ऑनलाइन उत्पादन विक्रीचे काम देखील करू शकता आणि पैसे कमवू शकता.
फक्त कॉलिंगच्या ग्राहकांसाठी BSNL चा भारी प्लॅन, मिळेल दीर्घ व्हॅलिडिटी
रील बनवताना या गोष्टी लक्षात ठेवा
- तुम्ही अपलोड करत असलेल्या व्हिडिओमधील म्यूझिक देखील ओरिजिनल असावे.
- तुमची रील ब्रँडेड कंटेंटच्या आधारित असावी
- तुमच्या रीलचा कंटेंट कोठूनही कॉपी केलेला नसावा.
- तुमच्या रीलमध्ये कोणतीही असभ्य भाषा वापरली जाऊ नये
- तुमचा रील किती लोक पाहत आहेत हे देखील महत्त्वाचे आहे.
- तुम्ही खोट्या बातम्या किंवा व्हिडिओ शेअर केल्यास, Instagram तुमचे अकाउंट सस्पेंड करू शकते.