शीळफाटा रस्त्यावरील वाहतूक विशेषतः संध्याकाळच्या वेळी येथे वाहतूक मोठ्या प्रमाणात संथ होते. त्यामुळे प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. यात दरम्यान कल्याण-तळोजा मेट्रो रेल्वेचे काम प्रगतिपथावर आहे. या मार्गाच्या कामासाठी सिमेंटचे गर्डर टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. एमएमआरडीएने नेमलेल्या कंत्राटदारामार्फत सोनारपाडा ते मानपाडा चौकादरम्यान हे काम केले जाणार आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक 10 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या 20 दिवसांच्या काळासाठी तात्पुरती वळवण्यात येणार आहे. याबाबत ठाणे वाहतूक पोलिसांनी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे.
advertisement
Weather Update: आता स्वेटर बाहेर काढा, मुंबई-ठाण्याची हवा बदलली, कोकणात थंडी, आजचं हवामान अपडेट
वाहतूक कुठे बंद असणार?
1. कल्याण शिळ रोडवरून कल्याणकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना मानपाडा चौक, पिलर क्र. 201 येथे प्रवेश बंद.
2. कल्याण शिळ रोडवरून कल्याणकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना डी.एन.एस. चौक, पिलर क्र. 144 येथे प्रवेश बंद.
पर्यायी मार्ग
मानपाडा चौक मार्गावरील वाहतुकीसाठी प्रवासी मानपाडा चौक पीलर नं. 201 येथून डावीकडे वळण घेऊन सर्विस रोडने सोनारपाडा चौक पर्यंत येथून पुन्हा उजवीकडे वळण घेऊन कल्याण शिळ रोडवरून इच्छित स्थळी जातील.
डी.एन.एस. चौक मार्गावरील वाहतुकीसाठी प्रवासी डी.एन.एस. चौक पीलर नं. 144 येथून डावीकडे वळण घेऊन सर्विस रोडने सुयोग हॉटेल, अनंतम रिजन्सी चौक येथून पुन्हा उजवीकडे वळण घेऊन कल्याण रोडवरून इच्छित स्थळी जाईल.






