प्रतिनिधी संजय शेंडे : अमरावती लोकसभेच्या भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा शिवसेना नेते माजी मंत्री आनंदराव अडसूळ यांच्या निवासस्थानी भेटीला घेतली. माजी आमदार अभिजीत अडसूळ व त्यांच्या पत्नी यांनी नवनीत राणा व रवी राणा यांचे औक्षण करून स्वागत केलं. खासदार आनंदराव अडसूळ आणि राणा दाम्पत्य यांच्यात केल्या अनेक वर्षापासून संघर्ष सुरू होता, नवनीत राणा यांच्या जात वैधता प्रमाणपत्राचा प्रकरण अडसूळ यांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत प्रकरण नेलं होतं.