छत्रपती संभाजीनगर : चित्रपटांमध्ये आपण अनेकदा बोलक्या बाहुल्या पाहिल्या असतील – ज्या हसतात, बोलतात आणि आपल्याशी संवाद साधतात. पण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सरला कामे मॅडम या त्या कल्पनांना शिक्षणात उतरवतात. त्या विद्यार्थ्यांना पपेट्स, म्हणजेच बोलक्या भावल्यांच्या माध्यमातून शिकवतात. गोष्टी, हावभाव, आणि संवादाच्या साहाय्याने त्या शिक्षणाला एक जिवंत स्पर्श देतात. या अनोख्या पद्धतीमुळे मुलं शिकतात… पण हसत-खेळत!