TRENDING:

धनप्राप्ती साठी होईल मदत; हे आहेत घरामध्ये स्फटिक श्रीयंत्र स्थापन करण्याचे फायदे

छत्रपती संभाजीनगर : घरात सुख, शांती, समृद्धी, धनाची वृद्धी होण्यासाठी ज्योतिष शास्त्रात स्फटिक श्रीयंत्राला खूप महत्त्व आहे. या स्फटिक श्रीयंत्राची जर आपण आपल्या घरामध्ये स्थापना केली आणि त्याची नित्य नियमाने पूजा केलीतर आपल्याला भरपूर असे फायदे होतात असं सांगितलं जातं. या स्फटिक श्रीयंत्राची पूजा आणि स्थापना केल्यानंतर आपल्याला काय काय फायदे होतात याविषयीचं छत्रपती संभाजीनगरमधील ज्योतिषाचार्य उमेश कुलकर्णी यांनी माहिती सांगितली आहे.

Last Updated: November 13, 2025, 19:41 IST
Advertisement

मैदा आणि गव्हाचे पीठ, अशी बनवली जाते प्रसिद्ध नान रोटी, पाहा Video

Food

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहराची ओळख ऐतिहासिक शहर म्हणून आहे. शहरामध्ये अनेक पर्यटन स्थळ आहेत हे बघून अनेक पर्यटक भारावून जातात. शहरातली अजून एक खासियत म्हणजे मोहम्मद-बिन-तुगलक यांच्या काळात त्यांच्या सैन्यासाठी एक खास नान रोटी ही तयार केली जात होती. ही नान रोटी शहरामध्ये अत्यंत प्रसिद्ध आहे. या नान रोटीला आजही मोठ्या प्रमाणात मागणी आहे. ही नान रोटी कशी तयार केली जाते याची माहिती छत्रपती संभाजीनगरमधील नान रोटी विक्रते सय्यद नईमन यांनी दिली आहे. 

Last Updated: November 13, 2025, 20:00 IST

PCOD असल्यामुळे वाढतंय वजन? आहारात करा 'या' गोष्टींचा समावेश Video

पुणे

पुणे : हल्ली चुकीच्या जीवनपद्धतीमुळे महिलांमध्ये मासिक पाळीच्या संदर्भातील समस्या दिसून येतं आहेत. त्यातच PCOD आणि PCOS यांसारखे मासिक पाळीच्या संबंधित आजार महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येतं आहेत. या कालावधीत काही महिलांचे वजन वाढते. ज्या महिलांना PCOD आहे त्या महिलांनी आपला आहार नेमका कसा ठेवावा? याविषयीचं पुण्यातील आहार तज्ज्ञ ज्योती येणारे यांनी माहिती दिली आहे.

Last Updated: November 13, 2025, 19:19 IST
Advertisement

मेनोपॉज दरम्यानच्या काळात महिलांचा आहार कसा असावा? पाहा तज्ज्ञांचा सल्ला Video

पुणे : मेनोपॉज म्हणजेच रजोनिवृत्ती होय. साधारणपणे महिलांचा मेनोपॉज (Menopause) म्हणजे रजोनिवृत्तीचा काळ 45 ते 50 वर्ष मानला गेला आहे. या काळात महिलांना मासिक पाळी येणं कायमचं बंद होतं. त्यामुळे वजन वाढणे, मानसिक तणाव, चिडचिड, हॉट फ्लशेस अशी लक्षणे दिसून येतात. त्यामुळे या काळात महिलांचा आहार कसा असावा? याविषयीचं पुण्यातील आहार तज्ज्ञ ज्योती येणारे यांनी माहिती दिली आहे

Last Updated: November 13, 2025, 17:55 IST

khasta namakeen : मैदा नाही तर गव्हाच्या कणकेपासून 10 मिनिटात बनवा खस्ता नमकीन; एकदा नक्की ट्राय करून पाहा ही रेसिपी Video

Food

चंद्रपूर : खस्ता नमकीन खायला सर्वांना आवडतं. मात्र सहसा खस्ता मैदा पासून बनविला जातो. त्यामुळे अनेकजण खाणं टाळतात मात्र तुम्ही गव्हाच्या कणकेपासून खस्ता नमकीन बनवू शकता. अगदी घरी सहज उपलब्ध असलेल्या साहित्यापासून ही चविष्ट रेसिपी बनते. तुम्ही प्रवासात जाणार असाल तेव्हाही कणकेपासून बनलेला खस्ता नमकीन सोबत नेऊ शकता. ही रेसिपी गव्हाच्या कणकेपासून अगदी 10 मिनिटांत कशी बनवायची याबद्दच चंद्रपूरमधील गृहिणी कांचन बावणे यांनी दिली आहे.

Last Updated: November 13, 2025, 17:31 IST
Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
धनप्राप्ती साठी होईल मदत; हे आहेत घरामध्ये स्फटिक श्रीयंत्र स्थापन करण्याचे फायदे
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल