महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्ययमंत्री एकनाथ शिंदे यांना बरं वाटत नसल्याने दुपारी ठाणे येथील ज्युपिटर रुग्णालयात दाखल झाले. त्यांच्यावर ज्युपिटर रुग्णालयात उपचार करण्यात आले. एकनाथ शिंदे यांचं चेकअप केल्यानंतर ते काही वेळाने रुग्णालयातून बाहेर पडले. यावर उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली असून काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रुटीन चेकअप साठी गेले होते असं ते म्हणाले.