TRENDING:

फॅट फ्री आणि भरपूर फायबर! Dragon fruit वजन कमी करण्यासाठी सर्वोत्तम

जालना : आहारात फळांचा समावेश असायला हवा, असा सल्ला आहारतज्ज्ञ अगदी लहान मुलांपासून सर्व वयोगटातील व्यक्तींना देतात. फळांमधून शरिराला विविध पोषक तत्त्व मिळतात. ज्यामुळे निरोगी राहता येतं. परंतु काही फळं आपल्याला बाजारात दिसतात, ताजी असतात, त्यांचा रंग चांगला असतो, त्यांची किंमत परवडणारी असते, मात्र केवळ आपल्याला त्यांबाबत माहिती नसते म्हणून आपण ते फळ विकत घेत नाही. ड्रॅगन फ्रुटही यापैकीच एक. आज आपण या फळाचे फायदे जाणून घेणार आहोत तेही आहारतज्ज्ञांकडून.

Last Updated: November 01, 2025, 17:52 IST
Advertisement

एकाच शेतात दोन पिके!पंढरपूरच्या प्रवीण वाघमोडे यांचा यशस्वी प्रयोग; ₹10 हजार खर्च करून कमवणार ₹1.5 लाख नफा!

Success Story

सोलापूर : महाराष्ट्रातील शेतकरी पारंपरिक शेती न करता प्रयोगशील शेती करून आर्थिक नफा कसा वाढवता येईल याचा विचार करून शेती करत आहे. असाच एक प्रयोग सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील कोरटी गावात राहणारे शेतकरी प्रवीण जगन्नाथ वाघमोडे यांनी केला आहे. एका एकरात डाळिंबाच्या बागेत अर्धा एकर पहिल्यांदाच हिरवी मिरचीची लागवड आंतरपीक म्हणून केली आहे. मिरचीच्या लागवडीसाठी प्रवीण यांना दहा हजार रुपयांपर्यंत खर्च आला असून आतापर्यंत मिरचीचे सहा तोडे झाले असून खर्च वजा करून चाळीस हजारांचा नफा मिळाला आहे. तर आणखी मिरचीची तोडणी सुरू असून दोन ते तीन महिन्यात हिरवी मिरची विकून एक ते दीड लाखांचा नफा मिळणार असल्याची माहिती प्रयोगशील शेतकरी प्रवीण वाघमोडे यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.

Last Updated: December 15, 2025, 13:58 IST

६७ व्या वर्षी घेतला 'हा' धाडसी निर्णय! निवृत्तीच्या वयात सुरू केला व्यवसाय; अच्युतराव यांच्या यशाची प्रेरणादायी कहाणी!

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरातील अच्युतराव केसरकर यांचे वय 70 वर्षे आहे. पण अवघ्या तीन वर्षांपूर्वी, म्हणजेच वयाच्या 67 व्या वर्षी त्यांनी एक धाडसी निर्णय घेतला तो म्हणजे, शुद्ध तेल घाण्याचा व्यवसाय सुरू करण्याचा. या वयात जिथे लोक निवृत्ती घेऊन आराम करण्याचा विचार करतात, तिथे अच्युतरावांनी स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कंबर कसली. तर त्यांच्या या प्रवासाविषयी माहिती पाहूयात

Last Updated: December 15, 2025, 13:25 IST
Advertisement

Health Tips : आरोग्यासाठी नैसर्गिक टॉनिक, वजन कमी करायला होईल मदत, बडीशेप खाण्याचे हे फायदे माहितीये का?

छत्रपती संभाजीनगर : आज वाढतं वजन अनेकांसाठी चिंता बनलं आहे. कामाचा ताण, अनियमित आहार आणि बसून राहण्याची सवय या सगळ्यांमुळे वजन नियंत्रणाबाहेर जातं. वजन कमी करण्यासाठी जिम, डाएटिंग अशा अनेक गोष्टी आपण करतो. पण कधी कधी आपल्या घरातील अगदी साध्या वस्तूंमध्येही प्रचंड आरोग्यदायी गुण लपलेले असतात. त्यापैकीच एक म्हणजे बडीशेप. जेवणानंतर तोंडाला सुगंध देण्यासाठी वापरली जाणारी ही छोटीशी दाणे असलेली बडीशेप, खरेतर संपूर्ण आरोग्यासाठी एक नैसर्गिक टॉनिक आहे. विशेषतः वजन कमी करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी ती अत्यंत उपयुक्त ठरते.

Last Updated: December 13, 2025, 18:37 IST

Idli Vada Pav Recipe:वडापाव भारीच...पण 'इडली वडापाव' खाऊन बघितलाय कधी? झटपट रेसिपी

Food

मुंबई : वडापाव म्हणजे मुंबईकरांचा जीव की प्राण...आणि मुंबईचा वडापाव म्हणजे देश-विदेशातील खव्वयांसाठी पर्वणी. तुम्ही आजवर मुंबईत किंवा मुंबईबाहेर वेगवेगळ्या ठिकाणच्या वडापावची चव चाखली असेल. काही वडापाव भारी लागले असतील, काही वडापाव लय...भारी लागले असतील. पण तुम्ही कधी इडली वडापाव खाल्लाय का? असा वडापावपण असतो? पडला ना प्रश्न? होय, हा पदार्थ चवीला एकदम Yummy लागतो आणि तो तुम्ही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीनं बनवू शकता.

Last Updated: December 13, 2025, 18:05 IST
Advertisement

पुण्यातील 135 वर्ष जुन्या वाड्यात मिळतोय वडापाव; रस्त्यासमोरून जाताना सुगंधानेच खावासा वाटेल!

Food

पुणे : वडापाव आवडत नाही अशी व्यक्ती सापडणं अवघड आहे. वडापाव आवडतं नाही अशी व्यक्ती सापडणं मुश्किल आहे . वडापावचा जन्म मुंबईत झाला असला तरी संपूर्ण देशात हा पदार्थ तितकाच लोकप्रिय आहे. बटाट्याची भाजी आणि पोळी खाण्याच्या ऐवजी या भाजीचे गोळे बेसनात कालवून ते तेलान तळून बटाटेवडा बनवण्यास सुरूवात झाली. तेव्हापासून वडापाव हा प्रत्येकालाच आपला वाटतो.

Last Updated: December 13, 2025, 17:31 IST
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/जालना/
फॅट फ्री आणि भरपूर फायबर! Dragon fruit वजन कमी करण्यासाठी सर्वोत्तम
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल