TRENDING:

'आनंद पोटात माईना!' 10 बाय 10 च्या झोपडीत राहणाऱ्या वनिता खरातनं खरेदी केलं हायफाय टॉवरमध्ये नवं घरं, PHOTO

Last Updated:
Vanita Kharat New Home : अभिनेत्री वनिता खरात हिनं नुकतंच मुंबईत नवं घर खरेदी केलं आहे. वनितानं नव्या घराचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलेत.
advertisement
1/9
10 बाय 10 च्या झोपडीत राहणाऱ्या वनिता खरातनं खरेदी केलं हायफाय टॉवरमध्ये नवं घरं
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमधून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री वनिता खरात. अनेक मालिका आणि सिनेमांमधून गेली अनेक वर्ष वनिता खरात काम करतेय. गेल्या अनेक वर्षांची तिची मेहनत अखेर फळाला आली आहे.
advertisement
2/9
10 बाय 10 च्या घरात बालपण काढलेल्या वनितानं मोठी भरारी घेतली आहे. वनितानं नुकतंच मुंबईत तिच्या हक्काचं घर खरेदी केलं आहे. वनितानं नव्या घराच्या गृहप्रवेशाचे व्हिडीओ आणि फोटो शेअर केलेत.
advertisement
3/9
वनिताचं नवं घर गगनचुंबी इमारतीत आहे. वनितानं नवं घर घेतल्याची बातमी समजताच तिच्या चाहत्यांनी तिला शुभेच्छा आणि आशीर्वाद दिलेत.
advertisement
4/9
"हक्काचं घर, हक्काची माणसं" असं कॅप्शन देत वनितानं तिच्या नव्या घराची पहिली झलक पाहायला मिळतेय. वनिताने तिचा नवरा, आई, कुटुंबातील सगळी मंडळी तसंच जवळचे मित्र मैत्रिणी यांच्या उपस्थितीत गृहप्रवेश केला.
advertisement
5/9
अभिनेत्री नम्रता संभेराव, रसिका वेंगुर्लेकर या कलाकारांनी हजेरी लावली होती. गृहप्रवेशावेळी वनिताची आई देखील खूप खुश होती. मुलीचं यश पाहून तिच्या डोळ्यात पाणी आलं.
advertisement
6/9
वनितानं घराबाहेर पूजा करून मोठ्या उत्साहात आणि आनंदानं घरात प्रवेश केला. आनंद पोटात मावेना अशी काहीशी अवस्था वनिताची झाली होती. आपल्या अत्यंत जवळच्या माणसांसोबत तिनं घरात प्रवेश केला.
advertisement
7/9
23 व्या मजल्यावर असलेल्या वनिताच्या घरातून बाहेरचा सुंदर नजारा पाहायला मिळतो. घरात प्रवेश केल्यानंतर वनितानं छोटी पूजा केली. तिच्या नवऱ्याची तिच्या मागे मोठी साथ असल्याचं पाहायला मिळालं.
advertisement
8/9
हक्काचं नवीन घर घेणं ही वनिताची स्वप्नपूर्ती होती. वरळी कोळीवाड्यात दहा बाय दहाच्या खोलीत ती राहत होती.
advertisement
9/9
घर समुद्राजवळ असल्यानं पावसाळ्यात मोठी लाट आल्यावर मोरीतून पाणी तिच्या घरात शिरायचं. एकदा जेवायला बसले असताना मोठी लाट आली, वनिताचं घर वाहून गेलं होतं. हा प्रसंग तिनं एका मुलाखतीत सांगितला होता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'आनंद पोटात माईना!' 10 बाय 10 च्या झोपडीत राहणाऱ्या वनिता खरातनं खरेदी केलं हायफाय टॉवरमध्ये नवं घरं, PHOTO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल